खेड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, उर्दू सेमी इंग्रजी माध्यमाची १ लाख ३१ हजार १४३ पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके येथील शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहेत. मात्र, पाचवी भूगोल तसेच तिसरी व चौथीची सामान्य विज्ञानाची पुस्तके शाळा सुरु होण्यापूर्वी प्राप्त होतील, अशी माहिती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगल व्हावळ यांनी दिली. येथील शिक्षण विभागाकडे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची एकूण १ लाख १२ हजार ४३४ संच, ऊर्दू व सेमी इंग्रजी माध्यमाची ८७०९ संच तितक्याच स्वाध्याय पुस्तकांचा त्यात समावेश आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी माध्यमाच्या पहिली ते आठवी बालभारती विषयाचे १७ हजार ५१३ संच, गणीत १५ हजार ६३९, इंग्रजी १७ हजार ५१३, इतिहास १४ हजार ७८, भूगोल १४ हजार ७८, सामान्य विज्ञान १२ हजार ९४२, नागरिकशास्त्र ७,६९९, हिंदी, सुलभ भारती ९,८१२, हिंदी - संस्कृत ११०, संस्कृ त दहा हजार ४०, सेमी इंग्रजी गणित १,८७४, सेमी इंग्रजी सामान्य विज्ञानच्या १,१३६ संचांचा समावेश आहे. उर्दू माध्यमाच्या पहिली ते आठवी बालभारती विषयाचे १२९४, गणित १०७९, इंग्रजी १२९४, इतिहास १०९७, भूगोल १०९७, सामान्य विज्ञान ९९४, नागरिकशास्त्र ६७२, हिंदी सुलभ भारती ८६४, सेमी इंग्रजी गणित २१५, सेमी इंग्रजी सामान्य विज्ञान १०३ संच आहेत. मराठी व ऊर्दू माध्यमाच्या स्वाध्याय पुस्तिकादेखील तेवढ्याच प्रमाणात दाखल झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या या दिवशी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके विद्यार्थ्यांना वितरीत केली जातील. (प्रतिनिधी)
सर्व शिक्षा योजनेंतर्गत १ लाख पाठ्यपुस्तके
By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST