शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

आठवड्याचे राशीभविष्य - 22 ते 28 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या लोकांना कामात यश, आर्थिक लाभ अन् भाग्योदयाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 09:51 IST

Weekly Horoscope 22 November to 28 November 2020 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या सूचना सुद्धा कौतुकास्पद होतील. कामाच्या ठिकाणी आपण आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून इतरांना सुद्धा उत्तम प्रकारे प्रभावित करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस आपणास काही व्यापारी संधी मिळतील. आपली कामे पूर्ण करण्यासाठी आपण सोप्या पद्धतीचा वापर कराल. ह्या वृत्तीमुळे शारीरिक श्रम कमी होऊन वजनात वाढ होईल. शुभ ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आर्थिक बाबतीत आपण यशस्वी होऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास थोडा मानसिक गुंता झाल्याने शांत राहून वेळ घालवावा. एखादी यात्रा किंवा उच्च शिक्षण संभवते. आठवड्याच्या सुरवातीस व अखेरीस आपण जर काही शिकण्याची व ज्ञान प्राप्तीची अपेक्षा बाळगून राहिलात तर उच्च शिक्षण घेण्यासाठी आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. निर्दोष सामाजिक प्रतिमेचा हेतू बाळगून आपण आठवड्याच्या सुरवातीस सार्वजनिक जीवनात सक्रिय व्हाल. आपल्या प्रणयी जीवनाची सुरवात सुद्धा चांगली होईल. विवाहेच्छुकांना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या मनासारखा जोडीदार मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यास आपणास एखादे व्यसन लागले तर शरीरात अशुद्धता वाढू शकेल. मानसिक बेचैनी, अनिद्रा, थकवा ह्यामुळे सुद्धा आपले आरोग्य बिघडू शकते. उत्तरार्धात आपण स्वतःसाठी एखादा उपचार घेण्याचा विचार करू शकाल.

वृषभ 

आठवड्यात आपण सुरुवातीपासूनच कामावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने कारकीर्द हि आपल्या केंद्रस्थानी राहील व त्यामुळे संबंधांकडे आपले काहीसे दुर्लक्ष होईल. अर्थात त्यामुळे आपल्या संबंधांवर काही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे दिसत नाही. शासकीय प्राधिकरणाशी एखाद्या बाबतीत चर्चे दरम्यान सावध राहावे. भागीदारी कार्यात एखादा निर्णय घेताना आपल्या भागीदाराचा अहंकार आपल्यात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत होऊ शकेल. सुरवातीस आपण आपले कौशल्य वृद्धिंगत करण्यावर अधिक लक्ष द्याल. उत्तरार्धात आपल्या प्राप्तीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आपण जर उच्च शिक्षणात रुची घेत असाल तर आठवड्याच्या सुरवातीस ते शक्य होऊन त्यात आपणास अनुकूल परिणाम सुद्धा मिळेल. संघर्ष व चिंता असून सुद्धा आपण जीवनात यशस्वी होऊ शकाल. सामान्य अभ्यासासाठी सुद्धा आठवडा आपणास अनुकूल असला तरी उत्तरार्धात अभ्यासात लक्ष लागू शकणार नाही. संबंधांकडे आपण अपेक्षेहून कमी लक्ष द्याल. जर आपण पूर्वी पासूनच एखाद्याच्या प्रेमात असाल तर ते टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. नवीन व्यक्तीशी संबंध जुळविण्याचा निर्णय घेण्यास आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. आपण आहारात प्रवाही पदार्थ, सूप, ग्रीन टी, रस, उकडलेल्या भाज्या ह्यांचे प्रमाण अधिक ठेवावे. तंदुरुस्त राहण्यासाठी बाहेरील पदार्थ व तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आठवड्याच्या सुरवातीस आपले आरोग्य चांगले राहिल्याने आपल्या कामगिरीत सुधारणा होईल, परंतु अखेरच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस गृहस्थ जीवन आनंदी राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यास आपल्या रचनात्मक व कलात्मक शक्ती खुलून उठतील. वैचारिक स्थैर्यामुळे आपण चिकाटीने कामे करू शकाल. व्यावसायिक कार्यात अधिक लक्ष केंद्रित केल्याने आपण प्रियव्यक्तीस किंवा आप्तांना आवश्यक तितका वेळ देऊ शकणार नाही. अर्थात त्यामुळे आपल्या संबंधांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. निव्वळ त्यामुळेच उत्तरार्धात प्रेमसंबंधांवर अधिक लक्ष केंद्रित करून व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनाचा समतोल आपण साधू शकाल. ह्या आठवड्यात नोकरीत आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात करून व वरिष्ठांच्या कृपेने आर्थिक लाभासह नवीन जवाबदारी सुद्धा मिळवू शकाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वार्ध अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत पित्त विकार किंवा डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असल्याने ह्या आठवड्यात थोडी काळजी घ्यावी लागेल. ह्या व्यतिरिक्त मधुमेह असणाऱ्यांना आत्ता पासूनच आहारावर अधिक लक्ष देण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या प्रियजनांशी असलेले संबंध व व्यक्तिगत जीवन ह्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आपले मन व्याकुळ झाल्याने किंवा एखाद्या बाह्य ताणामुळे आपल्या वागणुकीत अधिक कठोरता येऊन समाधान करण्याच्या वृत्तीपासून आपण दूर राहाल. त्यामुळे संबंधात दुरावा निर्माण होईल. प्रणयी जीवनात विक्षेप व व्यत्यय टाळण्यासाठी चित्त शांत ठेवावे लागेल. आठवड्याच्या मध्यास दूरवर राहणाऱ्या व्यक्तींशी आपले संपर्क वाढतील. देशांतर्गत कार्याशी संबंधित व्यक्तींची व्यावसायिक आघाडीवर अधिक चांगली कामगिरी होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपण कुटुंबियांच्या खुशीसाठी काही खर्च करण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात भागीदार, संचालक व अन्य व्यापाऱ्यांशी आपल्या संबंधात सलोखा राहील. शेअर्स बाजार किंवा कोणत्याही सट्टाकीय कार्याशी संबंधित व्यक्तींना ह्या आठवड्यात सावध राहण्याची आवश्यकता आहे. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष कमी लागले तरी मध्या पासून कारकिर्दीच्या बाबतीत ते अधिक गंभीर होतील. प्रकृतीच्या दृष्टीने आठवड्याची सुरवात थोडी निर्बळ असली तरी तिसऱ्या दिवसा पासून त्यात सुधारणा होईल.

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीस कार्यसिद्धीमुळे आपणास समाजात व कुटुंबात यश प्राप्त होईल. मनोरंजन, प्रवास, मित्रांची भेट, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र परिधान, भिन्नलिंगी व्यक्तींशी जवळीक आपणास आनंदित व रोमांचित करेल. भागीदारी कार्यात लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यास आपणास अनिच्छनीय प्रसंग, आजारपण, क्रोधावेशामुळे येणारे मानसिक नैराश्य इत्यादी विपरीत स्थितींसाठी तयार राहावे लागेल. ह्या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर व कौटुंबिक जीवनावर किंवा दैनिक कार्यांवर सुद्धा होण्याची शक्यता असल्याने आपणास त्याचा ताण जाणवेल. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण न ठेवल्यास संबंधात दुरावा येऊ शकतो. उत्तरार्धात आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल तसेच आर्थिक लाभाचे द्वार सुद्धा उघडतील. घरी नातेवाईक, स्नेहीजन व मित्रांचे आगमन झाल्याने आपल्या मनास आनंद होईल. विद्याभ्यासात कष्ट केल्यासच यश प्राप्त होईल. मित्र किंवा भावंडांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा त्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या एखाद्या कार्यास किंवा प्रकल्पास शासनाची मदत मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःचे काम पूर्ण करण्यास मदत होऊ शकेल. आपण योग्य दिशेने आत्मचिंतन कराल. स्वभावात भावनाशीलता वाढल्याने कुटुंबीय व प्रियव्यक्तीप्रती आपला कल वाढेल. ह्याचा परिणाम विशेषतः आठवड्याच्या मध्यास वैवाहिक किंवा प्रणयी जीवनावर होताना दिसून येईल. असे असले तरी आपल्यात एखादे लटके भांडण होण्याची शक्यता सुद्धा आहे. दीर्घकालीन गुंतवणूक किंवा नवीन साहसा संबंधित निर्णय सध्या लांबणीवर टाकावा किंवा खूप विचारपूर्वक पाऊले टाकावीत. उत्तरार्धात अचानक दुखापती पासून स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात आपले मन थोडे विषण्ण झाल्याने व्यावसायिक आघाडीवर सुद्धा थोडा त्रास संभवतो. विद्याभ्यासासाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. ज्यांना गूढ व आध्यात्मिक बाबतीत रुची आहे त्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळू शकेल. जीवनाचे रहस्य समजून घेण्यासाठी आपण आध्यात्मिकतेकडे वळाल.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना अनुकूलता लाभेल. दूरवरचे प्रवास होऊ शकतील, मात्र परदेशगमनाची इच्छा असल्यास त्यात अनिश्चितता असल्याचे दिसून येईल. पूर्वार्धात प्रेमसंबंध सुद्धा फुलतील. ह्या आठवड्यात विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सानिध्य उपभोगता येईल. ह्या आठवड्यात आपल्या संबंधात परिपकवता असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे मधले दिवस व्यावसायिक आघाडीवर यशस्वी होण्याचे आहेत. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. आठवड्याच्या मध्यास आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान नेत्र विकार संभवतात. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी आहाराकडे लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या कार्य सफलतेत दृढ मनोबल व आत्मविश्वासाची महत्वाची भूमिका असेल. संततीसाठी पैसा खर्च कराल, परंतु त्यांच्या आनंदातच आपला आनंद समाविष्ट असल्याने खर्चामुळे आपणास वाईट वाटणार नाही. विद्यार्थ्यांची सुरवातीपासूनच अभ्यासात चांगली एकाग्रता होऊ शकेल. अभ्यासाचे योग्य आयोजन केल्यास शैक्षणिक आघाडीवर उत्तम कामगिरी होण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस कामा ऐवजी कौटुंबिक बाबींवर अधिक लक्ष देण्यास आपण प्राधान्य द्याल. कोणत्याही कार्यात कुटुंबीय व त्यांच्या गरजा ह्यास आपली प्रार्थमिकता असेल. असे असले तरी व्यावसायिक कार्यांपासून आपण दूर होणार नाही. विशेषतः लोकांशी भेटीगाठी किंवा वाटाघाटीच्या कार्यात प्रगती होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास आपण सामाजिक सन्मान व प्रसिद्धीस पात्र व्हाल. त्याच बरोबर प्रेमसंबंध सुद्धा खुलून उठतील. सध्या आपले भिन्नलिंगी आकर्षण चांगले राहील, परंतु अति आवेशात हातून चूक होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. संबंध टिकवून ठेवण्यासाठी थोडे सौम्य सुद्धा व्हावे लागेल. उत्तरार्धात आर्थिक लाभाची शक्यता अधिक आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण बैठकीत, कार्यशाळेत किंवा इतर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आठवड्याच्या मध्यास विद्यार्थी अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ शकतील. ह्या आठवड्यात बहुतांशी शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखाद्या छोट्या प्रवासाचे आयोजन शक्य झाले तरी त्यात थोडा विलंब होऊ शकतो.

धनु

आठवड्यात कुटुंबियांच्या भावना, गरजा व व्यावसायिक संबंध ह्यांचा आपण समतोल साधू शकाल. मित्रांच्या सहवासाने आपणास आनंद तर होईलच शिवाय हा सहवास लाभदायी सुद्धा होऊ शकेल. वैवाहिक जोवनातील माधुर्याचा आस्वाद घेऊ शकाल. व्यावसायिक आघाडीवर अचानक धनलाभ संभवतो. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वाद घालू नका. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपणास उत्साह व तजेला जाणवेल. प्रणयी जीवन खुलून उठेल. इतर लोकांशी भावनिक संबंध जुळतील. प्रवास आनंददायी होतील. भिन्नलिंगी व्यक्तींच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल व त्यांचा सहवास आपणास सुखावून सोडेल. गणिताच्या विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. आपण जर विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर आपल्या रुचीत व्यावहारिकता असेल. आपण जस जसा जास्त अभ्यास कराल तस तशी आपली प्रतिभा विकसित होईल. आपल्या आहारात आपण दुधाचे पदार्थ, मध व नैसर्गिक साखरेचा समावेश करावा. नियमितपणे योगासने व प्राणायाम करून आरोग्याशी संबंधित समस्या टाळू शकाल व आजारी असल्यास त्यातून लवकर बरे व्हाल.

मकर 

आठवड्याच्या सुरुवातीस आपले लक्ष मुख्यत्वे प्राप्तीवर केंद्रित असेल. व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ संभवतात. वसुली, कर्ज किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे मिळवायचे असतील तर त्या संबंधीची कामे पूर्वार्धात होऊ शकतील. सरकारी कामात किंवा सरकार कडून एखादा लाभ होऊ शकतो. कामात आपल्या सर्जनात्मकतेचे दर्शन घडवू शकाल. सध्या वडील किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीमुळे चांगला फायदा होऊ शकेल. कामा निमित्त प्रवासाचे यशस्वी आयोजन होऊ शकेल, मात्र जर स्वतः वाहन चालविणार असाल तर काळजी घ्यावी. प्रेमसंबंधात सुद्धा ह्या आठवड्यात आपण पाऊल पुढे टाकू शकाल. विशेषतः प्रेमाची कबुली उत्तम प्रकारे करू शकाल. आपल्या मित्रमंडळातीलच एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक वाढू शकेल. विवाहा संबंधी निर्णय घेताना सारासार विचार करावा. उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित बाबींकडे सुद्धा आपण अधिक लक्ष द्याल. संततीच्या अभ्यासाकडे आपणास अधिक लक्ष द्यावे लागेल. शैक्षणिक कारकिर्दीत बदल होण्याची शक्यता आहे.

कुंभ 

आठवड्यात व्यावसायिक कामात आपण कदाचित घाई घाईत कामे उरकण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा काही हरकत नाही. ह्या दरम्यान हिंमत व साहस ह्यांचा प्रभाव जाणवू शकेल. आपण नैराश्याचा हात झटकून आशेचा हात धरू शकाल. सध्या आपल्या विचारात नावीन्य असल्यामुळे कामात त्याचा सकारात्मक उपयोग करू शकाल. देशांतर्गत कार्यात किंवा बहुराष्ट्रीय संस्थेशी संबंधित कार्यात आपण सर्जनशक्ती व बौद्धिकतेच्या जोरावर प्रगती साधू शकाल. सध्या कुटुंबियांशी थोडे विनम्रतेने वागावे लागेल. ह्या आठवड्यात आपली वाणी सुद्धा थोडी कठोर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपणास हट्टीपणा सोडावा लागेल. प्रेमसंबंध आपल्या मनाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. आपण प्रियव्यक्तीशी प्रभावीपणे संपर्क साधून जवळीक वाढविण्याचा प्रयत्न कराल. उच्च शिक्षणाशी संबंधित व्यक्तींची अभ्यासातील सर्जनशीलता दिसून येईल. ह्या आठवड्यात आरोग्य चांगले राहील. विशेषतः मागील आठवड्याच्या उत्तरार्धात जी बेचैनी किंवा सुस्ती जाणवत होती ती आता दूर होईल.

मीन

आठवड्याच्या पूर्वार्धात आपले मन अधिक प्रमाणात वैचारिक द्विधेत राहील. अशा परिस्थितीत कोणताही महत्वाचा निर्णय घेताना किंवा संबंधात अधिक सावध राहावे. आरोग्य व खर्च ह्या दोघांकडे लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या मध्यास आपल्या स्थितीत सकारात्मकता येईल. विवाहेच्छुक एखाद्या व्यक्ती समक्ष प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामात इतरांवर अवलंबून राहू नये. आठवड्याच्या सुरवातीस नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रोषास बळी पडावे लागेल. आठवड्याच्या मध्यास प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण करण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होतील. वरिष्ठ व वडीलधाऱ्यांची कृपादृष्टी आपल्यावर होईल. बौद्धिक प्रतिभेची गरज असलेल्या व्यावसायिक कार्यात सावधपणे मार्गक्रमण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास आपण स्वतःसाठी किंवा हौसमौज करण्यासाठी खर्च करू शकाल. उत्तरार्धात मित्र व स्नेहीजनांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या नियोजित शैक्षणिक कार्यात अचानकपणे अडथळे येऊन विलंब होईल, मात्र नंतर हा अडथळा दूर होऊन कार्यसिद्धी होऊ शकेल.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष