शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२१; घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता मिळतील, आर्थिक लाभ होईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:25 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. तब्बेतही सांभाळा. पैशाच्या देवाण- घेवाणीत लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. दुपारनंतर मात्र खूप खुशीत राहाल. अधिक वाचा

वृषभ - घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. अधिक वाचा

मिथुन - आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. अधिक वाचा

कर्क - वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. अधिक वाचा

सिंह - आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. घरातील व्यक्तींशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण आणि आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे. अधिक वाचा 

कन्या - सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. तब्बेतीचा त्रास होईल. अधिक वाचा

तूळ - आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर ताबा ठेवा. अधिक वाचा

वृश्चिक - मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. अधिक वाचा

धनु - कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. अधिक वाचा

मकर - महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ राहील. शारीरिक दृष्ट्या स्फूर्ती वाटणार नाही. अधिक वाचा

कुंभ - आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस न्याल. अधिक वाचा

मीन - आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचे योग आहेत. दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा