शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२१; दुर्घटनेपासून जपा, व्यवसायात सांभाळून राहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 07:20 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. अधिक वाचा

वृषभ - आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. अधिक वाचा

मिथुन - कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मनोरंजनाचे वारे मनात वाहतील. अधिक वाचा

कर्क - भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी. कुटुंबात शांतता नांदेल. अधिक वाचा

सिंह - आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ति होईल. अधिक वाचा

कन्या - गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. नवीन कार्याचा आरंभ करायला शुभ दिवस. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. अधिक वाचा

तूळ - सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. अधिक वाचा http://astro.lokmat.com/horoscopes/daily-horoscope/libra/

वृश्चिक - आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांना भेटण्याचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. अधिक वाचा

धनु - वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. शस्त्रक्रिये सारख्या बाबी आज नकोत. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. अधिक वाचा

मकर - सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्बेत सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अधिक वाचा

कुंभ - आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. कामाच्या जागी वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील. बढतीचे योग आहेत. मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखाल. अधिक वाचा

मीन - व्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास घडतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अधिक वाचा

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१