शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२१; अध्यात्मिक दृष्टीनं वेगळा अनुभव देणार दिवस, अध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 07:22 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

ठळक मुद्देजाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील. आज आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचा योग आहे. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. घरातील सदस्य आणि निकटवर्गीयांबरोबर प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. अधिक वाचा

मिथुन - आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे श्रीगणेशांना सूचित करायचे आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस जातील आणि त्यामुळे आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. अधिक वाचा

कर्क - आपण शांततेत आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिकदृष्टया चिंता आणि उद्वेग राहील. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद होतील. गैरसमज वाढतील आणि मन उदास राहील. आईशी मतभेद राहतील आणि तिच्या तब्बेतीची काळजी राहील. अधिक वाचा 

कन्या - कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. भाऊ बहिणींशी प्रेमाचे संबंध बनून राहील. मित्र आणि स्वकीयांशी सुसंवाद घडतील. अधिक वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. घरातील व्यक्तींशी वादविवाद होणार नाहीत. अधिक वाचा

वृश्चिक - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील व्यक्तींसमवेत दिवस आनंदात घालवाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. अधिक वाचा

धनु - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतिउत्साह आवरावा लागेल. अधिक वाचा

मकर - मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. विवाहोत्सुकांना जीवनसाथी अगदी सहज निवडता येईल. अधिक वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळेल. अधिक वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. शरीरात थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी व्यवहार जपून करा. संततीची काळजी राहील. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. अधिक वाचा