शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 07:51 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - कामानिमित्त प्रवास घडून येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. एकंदरीत ग्रहस्थिती चांगली आहे . 

वृषभ - व्यवसायात विक्री चांगली होईल. कामात नवीन बदल करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. काहींना अचानक धनलाभ होईल. 

मिथुन - आर्थिक लाभ होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठे निर्णय घेताना थोडी चलबिचल होईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

कर्क - मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मात्र, तब्येतीचा विचार करून खाणे पिणे सांभाळा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. 

सिंह - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मात्र, थोडे संयमाने कामे करा. कामे मार्गी लागल्याने उत्साह वाढेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या यशाचा आनंद साजरा कराल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

कन्या - महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. वसुलीची कामे सकाळच्या प्रहरात केल्यास यश मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल पैसे मिळतील आणि खर्चही होतील. गृहसजावटीकडे लक्ष द्याल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

तूळ - नोकरीत बदलीची शक्यता आहे. मात्र, बदल फायद्याचे ठरतील. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरी पाहुणे येतील. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. 

वृश्चिक - भाग्याचे पाठबळ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील कामाचे स्वरूप बदलेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. खाण्या पिण्याची लयलूट राहील. 

धनू - महत्त्वाची कामे दुपारच्या नंतर हाती घ्या. दुपारच्या सत्रात कामाची पूर्वतयारी करून ठेवा. कामाच्या योजना आखा. भाग्याचे पाठबळ मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मनासारखे भोजन मिळेल. वाहने जपून चालवा. एखाद्या नवीन उपक्रमात भाग घ्याल.

मकर - खर्चाला आवर घातला पाहिजे. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. वाहने जपून चालवा. दगदग होईल अशी कामे करू नका. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. महिलांना साड्या खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. 

कुंभ - जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. नवीन वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. महत्त्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. 

मीन - मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल नोकरीत प्रगती होईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.