शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- ३१ मार्च २०२२: तुम्ही कितीही काम करा, लोकांच्या लक्षात येणार नाही; त्यासाठी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 07:11 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- आर्थिक आवक मनासारखी राहील. मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल. मात्र मोठेपणा मिरवण्याच्या नादात पैसा खर्च केला जाईल. त्यामुळे खर्चाच्या बाबतीत थोडी सावधानता बाळगा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वेळ वाया जाईल. दगदग होईल.

वृषभ- नोकरीत चांगली परिस्थिती राहील. आपण जास्त काम करूनही ते लोकांच्या लक्षात मात्र येणार नाही. त्यामुळे आपण जे केले ते लोकांच्या लक्षात कसे येईल याकडे लक्ष द्या. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आर्थिक व्यवहार जपून करा.

मिथुन- नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. कितीही काम केले तरी लोकांची नाराजी राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

कर्क- महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. मात्र घाई करून कामे करू नका. प्रवासाचे नीट नियोजन करा. कामानिमित्त प्रवास करायचा असेल तर आधी माहिती घेऊन प्रवास करा. नाहीतर निष्कारण हेलपाटा होईल. जीवनसाथीवर राग काढू नका.

सिंह- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग, धावपळ होईल. मनस्ताप सहन करावा लागेल. नेमके काय करायचे ते उमगणार नाही. अशा वेळी शांतपणे विचार करून निर्णय घ्या. जवळचे सहकारी मदत करतील.

कन्या- मुलांना चांगल्या संधी चालून येतील. शत्रू डोके वर काढतील. मात्र त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळेल. मात्र थोडा रुसवाफुगवा राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

तूळ- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग होईल अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळणे योग्य ठरेल. नोकरीत तणाव राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. घरातील सदस्यांसाठी वेळ दिला पाहिजे. मुले मदत करतील.

वृश्चिक- गृहसौख्य चांगले राहील. एखाद्या व्यक्तीशी गैरसमज होतील. व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मुलांना यश मिळेल. त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. प्रवासात सतर्क राहा.

धनू- मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीचे व्यवहार पार पडतील. चांगले सौदे ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरी पाहुणे येतील. काही अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. कामाचे स्वरुप बदलेल.

मकर- आर्थिक आवक चांगली राहील. थोडे प्रयत्न करावे लागतील. मालमत्तेची कामे होतील. त्यात चांगला फायदा होईल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. भावंडांशी गैरसमज होतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल.

कुंभ- जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कुणी भावनिकदृष्ट्या गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. जोडीदार चांगली साथ देईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उन्हात फिरताना काळजी घ्या. नोकरीत दगदग, धावपळ होईल.

मीन- संमिश्र ग्रहमान राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. थोडे काळजीचे विचार पण येतील. पैसा येईल आणि तेवढ्याच प्रमाणात खर्च पण होईल. कामे आटोक्यात येतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.