शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २८ मार्च २०२२: प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल; जीवनसाथीशी सूर जुळतील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 07:26 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- कामे मार्गी लागतील. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. कामाचा ताण कमी राहील. अचानक मोठी संधी चालून येईल. त्यात फायदा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर हमखास यश मिळेल. आर्थिक बाजू बळकट राहील.

वृषभ- लोकांच्या भेटीगाठी होतील. मनावरचा ताण हलका होईल. पूजापाठ करण्यात मन रमेल. भाग्याची चांगली साथ राहील. अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासकार्य साधक ठरेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. 

मिथुन- फार दगदग होईल अशी कामं करू नका. शक्यतो आराम करा. कायद्याची बंधनं पाळा. अचानक धनलाभ होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

कर्क- तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. घरात किरकोळ कारणावरून गैरसमज होतील. व्यवसायात भागीदाराशी कटकटी होतील. मात्र आर्थिक लाभ होईल. थोडं संयमानं वागण्याची गरज आहे. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील.

सिंह- अनावश्यक कामाचं दडपण घेऊ नका. क्षुल्लक कारणावरून स्वत:ला त्रास होईल, असं वागू नका. प्रवास शक्यतो टाळा. वाहनं जपून चालवा. वेगावर मर्यादा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणं टाळा.

कन्या- लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. प्रवासाचा योग येईल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.

तूळ- सरकारी कामात यश मिळेल. अनेकांची मदत मिळेल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सफल होतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. नवीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

वृश्चिक- जवळचा प्रवास होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. कामांची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवून कामं करा. भावंडांच्या भेटी होतील. त्यांच्यासमवेत वेळ मजेत जाईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

धनू- व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. आर्थिक उलाढाली फायदेशीर ठरतील. अकल्पित लाभ होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध क्षेत्रांत सफलता मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. मनासारखे भोजन मिळेल.

मकर- कामात उत्साह राहील. मन प्रसन्न राहील. लोकांच्या संपर्कात राहाल. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात आगेकूच सुरू राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कुंभ- महत्त्वाच्या कामात व्यस्त राहाल. काही अडचणी येतील. कामाचा ताण वाढेल. दगदग कमी होईल, अशा बेताने कामे करा. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. 

मीन- ग्रहमान अनुकूल राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.