शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 04:14 IST

डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांपेक्षा भाजपने दिलेले वचन वरचढ आहे आणि ते पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे. सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, काँग्रेसने दिलेले आश्वासन हे गरीब कल्याण, जनकल्याण यासारख्या विषयांपर्यंत मर्यादित राहतात. आम्ही त्यापलीकडे जाऊन विचार करतो. देशात काँग्रेसने आजवर जेवढे काम केले नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक काम आम्ही मागील १० वर्षांमध्ये केले. राजस्थानमध्येही काँग्रेस सरकारने ५ वर्षांमध्ये काहीच केले नाही.

मावजी महाराजांचा आशीर्वाद...मावजी महाराजांचा आशीर्वाद घेत मी एक भविष्यवाणी करू इच्छितो आणि राजस्थानातील लोकांनी ती लिहून घ्यावी की, यावेळीच नव्हे, तर पुढेही राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले.

संस्कृतीचा सन्मान हेच ध्येय : शाह 

काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर भाजप मात्र भारतीय संस्कृतीचा सन्मान करत आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर प्रहार

जयपूर : अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांची सैन्यात भरती केली जात आहे. परंतु, या योजनेच्या माध्यमातून लाखो युवकांचे स्वप्नभंग झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. धोलपूरच्या राजाखेडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, मर्यादित कालावधी झाल्यावर या युवकांनी करायचे काय? त्यांना सैन्यात कायमस्वरूपी घेतले जाणार नसल्याने ही योजना देशातील युवकांचे स्वप्नभंग करणारी आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते ओबीसी आहेत. परंतु, जेव्हा आम्ही जातजनगणनेचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा ते देशात केवळ गरीब ही एकच जात असल्याचे सांगतात. मते मिळविण्यासाठी ओबीसीचा नारा देतात आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा देण्यास नकार देतात.

देशाचा पैसा कुठे चालला? केंद्र सरकार म्हणते आम्ही लोकांसाठी अनेक योजना राबवतो. विविध योजनांच्या माध्यमातून पैसा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. देशातील पैसा कुठे चालला आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही राहुल यांनी यावेळी केली.

महागाईपासून दिलासा : प्रियंका

देशात महागाई वाढली आहे. परंतु, काँग्रेसच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये महागाई झळ बसली नाही, असे कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी