शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:11 IST

अनेक ठिकाणी राहू शकताे निर्णायक, मायावतींच्या नव्या राजकीय खेळीकडे लक्ष

जयपूर : मतांची विभागणी निवडणुकीच्या निकालाचे संपूर्ण समीकरण बदलू शकते. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीने (बसप) २५ पेक्षा जास्त जागांवरील निकाल प्रभावित केले हाेते. बसपच्या उमेदवारांनी जेवढी मते मिळविली, त्याचा भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या निकालावर परिणाम झाला. त्यामुळे यावेळीही बसपचा हत्ती राजस्थानात किती जणांचे निकाल ठरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बसपचा प्रभाव किती?

nराजस्थानात मायावती यांचा पक्ष निकालांवर परिणाम करू शकण्याच्या स्थितीत आहे की नाही, याकडे राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे. nबसपच्या प्रमुख मायावती यांनी विधानसभा निवडणुकीत खेळलेली राजकीय चाल थेट लाेकसभा निवडणुकीवर प्रभाव पाडू शकेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.n२००८च्या निवडणुकीत बसपने ७.५ टक्के मते मिळविली हाेती, तर २०१८ मध्ये यात घट हाेऊन मतांचे प्रमाण ४ टक्क्यांवर आले. n२०१८ मध्ये बसपचे ६ उमेदवार विजयी झाले, तर सुमारे २५ पेक्षा जास्त जागांवर मतांचे समीकरण पालटले.

काय आहे मायावतींची राजकीय खेळी?

बसपचे आमदार विधानसभेत जातात. अपेक्षित जनाधार प्राप्त करू शकत नाही. सत्तेत सहभागी न हाेणे, हे यामागील कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

यावेळी आपल्या पक्षामुळे काेणाचे सरकार स्थापन झाल्यास आपण सरकारमध्ये सहभागी हाेऊ, असे मायावतींनी जाहीर केले आहे. याचा लाेकसभा  निवडणुकीवरही परिणाम हाेऊ शकताे.

बसपने ४ ते ५ टक्के मते प्राप्त केल्यास २० ते २५ जागांचा निकाल थेट प्रभावित हाेऊ शकताे. 

१८५ उमेदवार बसपने यावेळी दिले आहेत.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावती