शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:22 IST

नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

नेरळ : नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे त्या बंधाºयाने मोकळा श्वास घेतला असून या पावसाळ्यात कोमलवाडीमधील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि तरुण यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे अशी माहिती कोमलवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना विचारून घेतली. स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी वाडीच्या मागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याची माहिती दिली. त्यानुसार मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते असलेले प्रमोद डबरे, विकास कराळे, दिनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम,रवींद्र खांबल आणि रवींद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन २५ मे रोजी श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली,त्यावेळी स्थानिक आदिवासी देखील या तरुणांच्या मदतीला आले. दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्ते यांनी तेथे आणून माती आणि दगड डम्परमधून टाकून नेले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला. बंधाºयातून किमान २० डम्पर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि आदिवासी यांना यश आले.>दरवर्षी भासते पाणीटंचाईमाथेरान डोंगरात २००५ मध्ये भूस्खलन झाले होते. यात मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली येऊन अनेक नाले आणि बंधारे मातीने भरून गेले होते.त्यामुळे दरवर्षी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्या वर वाहून जाणाºया त्या सिमेंट बंधाºयात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे.त्यामुळे त्या सिमेंट बंधाºयाच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणीसाठा अधिक प्रमाणात होणार आहे. त्याचवेळी ग्रामस्थांची पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याबद्दल कोमलवाडी ग्रामस्थ सुनील कांबडी यांनी मानव अधिकार मंडळाचे आभार मानले.