शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाड-रायगड मार्गावर अपघातात तरुण ठार, आई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:57 IST

महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

दासगाव : महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. मात्र, महामार्गावर सुरू असलेल्या वाहन तपासणीत संशय आलेले वाहनच अपघातातील असल्याचे उघड झाले. वाहनचालकाला महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महाड-रायगड मार्गावर नाते गावाजवळ किल्ले रायगड पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरची आणि महाडकडून कोंझर गावाकडे जाणाºया दुचाकीमध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार संदीप पवार (३६) हा तरुण जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची आई मालती पवार (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवले आहे.टेम्पो ट्रॅव्हलरचालकाने अपघात झाल्यानंतर तत्काळ पळ काढला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली पोलीस पथकास या अपघातग्रस्त वाहनाला ओळखण्यात यश आले. महाड शहर पोलिसांनी एक वाहन दुचाकी अपघात करून पळून गेल्याचे कळवताच टेम्पो ट्रॅव्हलरचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. वाय. एम. गायकवाड यांनी दिली. या पथकात हेड कॉन्स्टेबल एच. सी. चव्हाण, आर. एम. पवार, एस. जी. सावंत, व्ही. व्ही. पाटील, जी. ए. भिलारे यांचा समावेश होता. 

टॅग्स :Accidentअपघात