शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी आदिवासीवाडीवर साजरी केली दिवाळी; फराळाचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 22:52 IST

कार्लेतील आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हसू

दिघी : जिथे अन्य लोक फटाक्यांच्या धुरामध्ये पैशांचा दुरुपयोग करून पर्यावरणाची हानी करत आहेत. दिवाळी सण म्हटले की, मध्यमवर्गीय कुटुंब आपले पैशाचे गणित जुळवून सण साजरे करतात; पण या सर्व धामधुमीत आपल्या जवळचा आदिवासी समाज मात्र गरिबीमुळे उपेक्षित राहतो. त्यांनाही मनात जाणवत असणार की, आपणही इतरांप्रमाणे हा दिवाळी सण गोड पदार्थ करून साजरा करावा. याच जाणिवेतून युवा एकता प्रतिष्ठानमधील तरुणांनी या वेळची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली. या वेळी कार्ले आदिवासीवाडी येथे फराळ वाटप करण्यात आले.

आपणही या समाजाचे देणेकरी लागतो, या भावनेतून गावातील नागरिकांना एकत्र घेऊन या आदिवासी समाजासाठी फराळवाटपाचा संकल्प केला व यासाठी प्रतिष्ठानमधील अनेक सदस्यांनी पुढाकार घेत आपआपल्या घरातून फराळ एकत्र करून कार्ले येथील आदिवासीवाडीमध्ये याचे वाटप करण्यात आले. कार्ले आदिवासी वाडीवरील समाज अतिशय गरीब व होतकरू आहे. दिवसा कामाला जायचे व दिवसभर काम करून जो मोबदला मिळतो त्यावर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा. साधारण ५० ते ६० घरांमध्ये जाऊन या फराळाचे वाटप करून तेथील लहान मुलांसोबत त्यांच्या आनंदात या सर्व युवकांनी सहभाग घेत भविष्यात या समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला. यामध्ये या समाजाकरिता ज्या शासनाच्या योजना असतात त्यांचा लाभ त्यांना मिळवून देणार.तसेच त्यांचे आरोग्य, तिथल्या मुलांचे शिक्षण तसेच इतर अनेक समाजोपयोगी काम हाती घेऊन लवकरच इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणले जाईल, अशी खात्री देत त्यांनी या गावातून निरोप घेतला.वनवासी पाड्यावर मिठाईचे वाटपमुरुड : आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दिवाळी सण साजरा करणे गोरगरिबांना शक्य होत नाही. कष्टकरी वनवासी मंडळी सणाला गोडधोड करू शकत नाहीत. आपल्याच बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही विहिंपतर्फे फराळ वाटप करण्यात आले. टक्याच्या आदिवासीवाडीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे ४६ कुटुंबीयांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी विहिंपचे मुरुड तालुका प्रखंड प्रमुख दिलीप दांडेकर, सुनील विरकुड, राजाराम ठाकूर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड