शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या किनारपट्टीत बुडून यंदा ११ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 07:09 IST

कोपरखैरणेमधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्रवारी अलिबागजवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून, समुद्रात बेपत्ता झाले.

- जयंत धुळपअलिबाग -  कोपरखैरणेमधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्रवारी अलिबागजवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून, समुद्रात बेपत्ता झाले. त्यापैकी आशिष मिश्रा आणि सुहास सिद्दगी यांचे मृतदेह शनिवारी सापडल्यावर संध्याकाळी त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र चैतन्य किरण सुळे हा मात्र अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध रायगड पोलीस गस्तीनौका आणि तटरक्षक दलाच्या बोटींतून घेत असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. रायगडच्या किनारपट्टीतील सागरीसुरक्षा दलाच्या सदस्यांनादेखील किनारी भागात नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.पर्यटनास गेल्यावर संयम अत्यावश्यक आहे. मोहाचे अनेक क्षण समोर येतात आणि धाडस करण्याची इच्छा होते; परंतु अशावेळी संयम अत्यावश्यक आहे. हा संयम पाळला नाही, तर जिवावर बेतण्याची वेळ येते आणि कारण नसताना निसर्गाच्या वाट्याला बदनामी येते, अशी भूमिका साहसी खेळ आणि गिरिभ्रमण उपक्रम आयोजक युथ हॉस्टेल्स असोसिएशन आॅफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रमेश किणी यांनी व्यक्त केली आहे.पर्यटन वा गिरिभ्रमणास गेल्यावर स्थानिकांकडून मिळणारी इतिहास, भूगोल आणि पर्यावरणविषयक माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण वमार्गदर्शक असल्याने, ती मिळविण्याकरिता स्थानिकांशी आवर्जून संपर्क साधून संवाद साधावा, असे आवाहनदेखील किणी यांनी यानिमित्ताने केले आहे.३० मेपासून किनाऱ्यांवर पर्यटकांना बंदीमान्सूनपूर्व वातावरणातील बदलाने खवळलेल्या समुद्रात पोहायला गेल्यास बुडण्याच्या घटना घडू नयेत म्हणून वरसोली, काशिद, नागाव किनाºयावर पर्यटकांना सुरक्षासाधनांशिवाय पोहण्यास लाइफगार्ड, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्याकडून मज्जाव केला जात आहे.दरम्यान, ३० मेपासून रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहेत. त्याचबरोबर वॉटरस्पोर्टसही बंद राहणार आहेत. काशिद समुद्रकिनाºयावर येणाºया पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड