शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

शहापूर-धेरंड कांदळवन क्षेत्रात चुकीचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:27 AM

शहापूर-धेरंड परिसरात टाटा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याकरिता एमआयडीसीकरिता महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या भूमिसंपादनाच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे

जयंत धुळपअलिबाग : शहापूर-धेरंड परिसरात टाटा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याकरिता एमआयडीसीकरिता महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या भूमिसंपादनाच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे, अतिसंरक्षित म्हणून केंद्र सरकारकडून घोषित कांदळवने (मॅन्ग्रोज) संपादित क्षेत्रात आले. या चुकीच्या ठरलेल्या भूमिसंपादनाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगड जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यास अनुसरून मंगळवारी अलिबाग उपविभागीय महसूल (प्रांत) अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या संपूर्ण क्षेत्राची पाहणी केली. संपादित क्षेत्र आणि संपादित क्षेत्राच्या शेजारी कंदळवने नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असल्याचे निष्पन्न झाले आहे.टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पास जागा उपलब्ध करून देण्याकरिता एमआयडीसीद्वारे शहापूर-धेरंड पसिरातील भूमी संपादनाकरिता संयुक्त मोजणी ८ जून २०१० रोजी करण्यात आली होती; परंतु ही मोजणी करताना अलिबाग तालुका भूमी अभिलेख निरीक्षकांनी त्या वेळी वन अधिकारी वा वनखात्याच्या प्रतिनिधीस निमंत्रित केले नव्हते. परिणामी, या संपादन क्षेत्रातील कांदळवनांची नोंद होऊ शकली नाही. परिणामी, कांदळवने प्रत्यक्षात अस्तित्वात असूनदेखील ५० मीटरची ‘ना विकास क्षेत्र हद्द’ कायम होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवनाच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नाही, ही बाब तत्कालीन विभागीय आयुक्त देशमुख यांच्या समवेत ३ मे २०१७ रोजी कोकणभवन येथे झालेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाने लक्षात आणून दिली.संपादन क्षेत्रातील कांदळवने ही बाब तत्कालीन विभागीय आयुक्त देशमुख यांनी अत्यंत गांभीर्याने विचारात घेऊन, या संपादन क्षेत्राची पाहणी अलिबाग उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, एमआयडीसी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे करून शासनास अहवाल द्यावा, असे आदेश दिले होते. त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासही तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला आणि अखेर मंगळवार, १६ जानेवारी या चरीच्या ऐतिहासिक शेतकरी संपाचे प्रणेते नारायण नागू पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच संपादन क्षेत्राची पाहणी धेरंड-शहापूर गावांच्या हद्दीत करण्यात आली.अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या समवेत एमआयडीसीचे अभियंता एस. एस. खाडे, भूमिअभिलेख खात्याचे ए. एस. वैद्य, वनविभागाचे अधिकारी आर. के. पाटील, शहापूर सजाचे तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांचा या संयुक्त पाहणी पथकात समावेश होता. या वेळी शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुधीर थळे श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी राजन भगत, नंदन पाटील व शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी शहापूर ग्रामपंचायत कार्यालयात अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी उपस्थितांना पाहणी संदर्भात माहिती दिली. संपादन क्षेत्रात कांदळवन असल्याचे सर्व अधिकाºयांनी मान्य केल्याची माहिती राजन भगत यांनी दिली.