शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागरण

By admin | Updated: October 2, 2016 03:05 IST

जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून महाड निसर्ग आणि प्राणि संवर्धन क्षेत्रात सक्रीय कार्यरत सिस्केप संस्थेच्या माध्यमातून शनिवारपासून ७ आॅक्टोबरपर्यंत रायगड

- जयंत धुळप,  अलिबागजागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून महाड निसर्ग आणि प्राणि संवर्धन क्षेत्रात सक्रीय कार्यरत सिस्केप संस्थेच्या माध्यमातून शनिवारपासून ७ आॅक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, पाली सुधागड, मुरूड या तालुक्यांमध्ये पर्यावरण व प्राणी संवर्धनात्मक जनजागरण करणारे अनेकविध कार्यक्र म आयोजित केल्याची माहिती सिस्केप संस्थेचे संस्थापक तथा पर्यावरण अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांनी दिली आहे.जनजागरण उपक्रमांमध्ये प्रामुख्याने सायकल रॅली, प्रभात फेरीच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घेणे, शाळांमध्ये व शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान व स्लाईडशोचे आयोजन करणे, दुर्मिळ वन्य जीवांची ओळख व्हावी या हेतूने वन्यजीवांच्या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांनी कॅमेराबद्ध केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करणे, परिसरातील निसर्गप्रेमींना भटकंतीच्या माध्यमातून पक्षी आणि वन्य जीवांविषयी माहिती देणे, चर्चासत्रांचे आयोजन, लघुपट, स्लाईडशोज, यांचा समावेश राहाणार आहे. १९९६ मध्ये महाड येथे कोकण पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून सह्याद्री मित्र, गिरीभ्रमण संस्थेने पक्षी अभ्यासाचे नवे दालनच उभे केले. यावेळी प्रसिद्ध झालेल्या वन्य जीव अहवालामध्ये ३३४ जातींचे पक्षी महाड परिसरात आढळलेहोते. गिधाड संवर्धनदुर्मिळ होत चाललेल्या शहाबाज गरूड, समुद्री गरूड, मोठा धनेश (हॉर्नबील), बगळ्यांच्या विविध जाती, खाजणीतील खंड्या (ब्लॅक कॅप किंगफिशर) आदी पक्षांच्या घरट्यांचे सर्वेक्षण व नोंदी करून संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गिधाडांचे अस्तित्व परिसरात शोधण्याचा प्रयत्न सिस्केप संस्थेकडून करण्यात आला. आणि तेरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी गिधाड संवर्धनात यश आले आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे गिधाडांची १५० ते १८० झाली आहे.