शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अपंग दिन विशेष: दिव्यागांची रायगडावर यशस्वी चढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 21:44 IST

पंचावन्न दिव्यांग साहसीवीरांची कमाल

- जयंत धुळपअलिबाग  - निसर्गाने अन्याय केलेल्या परंतु स्वतःच्या इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देणाऱ्या दिव्यांगांनी पुन्हा एकदा कमाल केली. रायगड किल्ला पायऱ्यांनी झपाझप चढून त्याची भ्रमंती करण्याचे साहस मुंबईतील पंचावन्न दिव्यांगांनी करून दाखवले. जूहूच्या रोटरी क्लब आणि फिनिक्स फाऊंडेशनच्या दिव्यांग मित्रांनी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला केलेले हे साहस भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारे ठरले.मुंबईहून 1 डिसेंबरला सकाळी फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने दिव्यांगांच्या रायगड स्वारीला प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि किल्ले रायगडाच्या घाटातील काही अपघात यामुळे रायगड स्वारी करण्यास संध्याकाळ झाली. चढाई करेपर्यंत होणाऱ्या काळोखाची तमा न बाळगता दिव्यांगांनी सायंकाळी 4 वाजता रायगड किल्ल्याच्या नाणे दरवाजापासून चढायला सुरूवात केली.  कोणी कुबड्या घेऊन, तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन, असे पन्नासएक दिव्यांग रायगड चढत होते. सुट्टीचा वार असल्याने पायवाटेवर गर्दीही होती. सोबतीला फिनिक्स फाऊंडेशनचे सोबती होते. त्यामुळे सर्वांना सांभाळून नेलं जात होतं. रविवारचा संपूर्ण दिवस दिव्यांगांनी इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती केली. ढोपराखाली सळई बसविलेल्या विनोद रावत यांनी तर आपली प्रतिक्रिया देण्यापूर्वी जय शिवाजी जय भवानी अशी गर्जना केली. अंगात हत्तीचं बळ आलेले रावत भावनावश झाले होते. फिनिक्स फाऊंडेशनचे आभार मानून त्यांनी रायगड सर करताना कोणताही त्रास झाला नसून उत्साहाला उधाण आल्याचं सांगितले. छत्रपतींचे हे विश्व पाहताना मावळा झाल्यारखे वाटत असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर आयोजक दिनेश पाटील व फाऊंडेशनचे संस्थापक संतोष संसारे यांनी हा उपक्रमाद्वारे दरवर्षी वेगवेगळे गड, शिखर दिव्यांग मोठ्या उत्साहाने सर करतात. त्यांचा आनंद हेच संस्थेचे यश असते, अशा भावना व्यक्त केल्या.गेली अठरा वर्षे फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील साहसी भ्रमंतीत दिव्यांगांना सहभागी करण्याचे धाडस केले जात आहे. कळसूबाईसारखे उंच शिखर, अनेक सुळके, लोहगडासारखे अवघड किल्ले यापूर्वी अशा दिव्यांगांनी फिनिक्स फाउंडेशनच्या मदतीने सर केले आहेत. या साहसी उपक्रमास महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सहभागी दिव्यांगांची भेट देऊन त्यांच्या उपक्रमास शाबासकी देऊन दिव्यांगांचे कौतुक केले. 

टॅग्स :RaigadरायगडFortगड