शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान व मानवी हक्क' या विषयावर कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2023 15:52 IST

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले.

- मधुकर ठाकूर 

उरण: राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान  व मानवी हक्क' याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून 'संविधान व मानवी हक्क ' या विषयांवर कार्यशाळा गुरुवारी ( ८) संपन्न झाली.

याप्रसंगी संविधान संकल्पना,स्वरूप व उपयुक्तता या विषयावर द. ग.तटकरे कॉलेज, तळा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भगवान लोखंडे यांनी  व्याख्यान दिले.खऱ्या अर्थाने संविधान व भारतीय नागरिक याविषयावर बारकाव्याने आपली निरीक्षणे नोंदविली.आजच्या तरुणांना संविधानाचे महत्त्व व अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे,असे पहिल्या सत्रात नमूद केले.प्राचार्य डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोखंडे यांच्या भाषणावर मांडणी केली.

दुसऱ्या सत्रात पनवेल येथील माहिती अधिकार अभ्यासक,व सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांनी आपल्या भाषणातून आजचा विद्यार्थी आणि मानवी हक्क याविषयावर उदाहरणांसह मांडणी केली. सामाजिक कार्य करीत असताना कायदा, संविधान,समाजाचे मानसशास्त्र व समाजशास्त्र कशा पद्धतीने विकसित केले पाहिजे यावर वास्तव मते मांडली.आदिवासींच्या हक्क,जातीयव्यवस्था या विषयांवरही त्यांनी  परखडपणे आपली मते मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.विलास महाले, प्रा.चिंतामण धिंदळे  प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.स्नेहा म्हात्रे,प्रा.डॉ.आर.बी.पाटील,प्रा.योगेश कुलकर्णी, प्रा.चारुशीला भगत, प्रा.गजानन चव्हाण,प्रा.बळीराम पवार,प्रा.श्रीकांत गोतपगार,डॉ.रत्नमाला जावळे, प्रा.राम गोसावी, डॉ.सुजाता पाटील ,राष्ट्रीय सेवा योजनेचे गटप्रमुख, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड