शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

साळाव-आगरदांडा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 22:58 IST

Salav-Agardanda road : साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सात कोटींचे काम मंजूर करण्यात आले होते.

मुरुड : तालुक्यातील मुंबईला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याचे काम अद्यापर्यंत अर्धवट स्थितीती राहिल्याने नागरिकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला असून, तसे संकेत मिळत आहेत. नोव्हेंबरमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे, तातडीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे बांधकाम खात्याकडून स्पष्ट झाले आहे. साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सात कोटींचे काम मंजूर करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता साळावपासून सुरुवात करून बारशीव हद्दीपर्यंत आणला आहे, नंतर हे काम बंद केल्याने मुरुड ते बारशीवच्या अलीकडील रस्ता तसाच ठेवल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यामधून प्रवास करावा लागत आहे.मुरुड तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले असून, या रस्त्यांचा पर्यटक, ऑटो रिक्षाचालक व दुचाकीस्वार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एवढे सर्व घडत असताना, मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे जनतेला रस्त्यांबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती, त्यामुळे हा रस्ता कधी होणार, हा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना सतावत होता. या संदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत कार्यकारी अभियंता यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती, तसेच या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते.सार्वजनिक बांधकाम खाते आता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याप्रमाणे, तातडीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे बांधकाम खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. साळावपासून जो रस्ता तयार केला, तो बारशीव चढणीपर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक जनता त्रस्त झाली होती. 

टॅग्स :Raigadरायगड