शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या बंधा-यांच्या दुरुस्तीचे श्रमदानातून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:24 IST

समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे.

अलिबाग : समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शहापूर-धेरंडच्या शेतकºयांशी केलेल्या सखोल चर्चेअंती या सर्व शेतकºयांना खºया अर्थाने नवा आत्मविश्वास गवसला असल्याचे गुरुवारी शहापूरमधील २००च्या वर स्त्री-पुरुष शेतकºयांनी श्रमदामातून फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचे दुरुस्तीचे काम सुरू के ले आहे.समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय झाला आहे; परंतु गावांतील सर्व शेतकºयांची जॉब कार्ड तयार होऊन, कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास किमान १० ते १२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, येत्या १५ फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती (खांडी बुजविणे) केली नाही, तर पुन्हा अमावास्येच्या उधाणाला गावात समुद्राचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे.नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन, शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ भगत, महादेव थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आता आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरु ष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून यायचे आहे. त्यांच्या या हाकेला (आवाहनाला) सर्व गावकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन, गावाच्या पूर्वे कडील बाजूस असलेल्या भंगारकोठ्यातील भगदाडे (खांडी) गुरुवारी दिवसभर श्रमदान करून बांधून काढली. शुक्रवारी पुन्हा पश्चिमेकडील बाजूस जाऊन उर्वरित भगदाडे (खांडी) बांधणार असल्याची माहिती अमरनाथ भगत यांनी दिली आहे.>संरक्षक बंधाºयांच्या २५ भगदाडांच्या मोजमापाच्या नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागाकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले आहेत. मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत.या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावातील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.गुरुवारी बांधून काढलेल्या सुमारे १३ ते १४ भगदाडांची (खांडींची) मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड