शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

खोरा बंदरातील वाहनतळाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:34 IST

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी खोरा बंदराचा नुकताच विकास करण्यात आला.

- संजय करडेमुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी खोरा बंदराचा नुकताच विकास करण्यात आला. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून खोरा बंदराला दगडाची संरक्षक भिंत उभारण्यात आली. या बंदरातील गाळ काढण्यात आला, त्याचप्रमाणे वाहनतळासाठी जागा वाढवण्यात येऊन त्यावर दगडी अंथरण्यात आली; परंतु यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा ठेके दाराला विसर पडला व काम अर्धवट ठेवून त्याने या कामाकडे दुर्लक्ष केले.जर ठेके दाराला काम करावयाचे असते तर त्याने हे एप्रिल, मेमध्येच केले असते; परंतु हे काम मागील सहा महिन्यापासून तसेच प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ठेकेदारास बिल अदा करण्यात आले; मात्र तरीही काँक्र ीटीकरणाचे काम अर्धवट ठेवल्याने खोरा बंदरातील वाहनतळाचे काम पूर्ण होणार की नाही हा प्रश्न येथील स्थानिकांकडून उपस्थित के ला जात आहे.ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी वर्षभरात पाच लाखांच्या आसपास पर्यटक येत असतात, अशावेळी त्यांची चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने लावल्याने वाहतूककोंडी होत असते, आता या पार्किंगचे काम न झाल्यामुळे पर्यटकांची वाहने रस्त्यावर लावावी लागणार आहेत.महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाने ठेका दिला; परंतु काम पूर्ण न करता बिल अदा करण्याच्या अनोख्यापद्धतीमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खोरा बंदरात मागील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे झाली आहेत. प्रत्यक्ष पहाता ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येते. ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे व ठेकेदाराच्या सोयीसाठी ही कामे केल्याचे दिसून येत आहे. अनेक कामे अर्धवट असताना सुद्धा ठेकेदाराला बिल अदा केल्याचे दिसून येत आहे. तरी या प्रकरणाबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्जा नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यासाठी मागणी करणार आहे.- नम्रता कासार, सदस्य, जिल्हा परिषदखोरा बंदरातील काम हे सोलिंग व्यवस्थित होण्यासाठी एक पावसाळा खाणे आवश्यक होते. पाणी व्यवस्थित जिरल्याने काँक्रीटीकरण मजबूत होणार आहे. यासाठी हे काम मे महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. गणपतीनंतर आम्ही खोरा बंदरातील काँक्रीटीकरण पूर्ण करणार आहोत. संबंधित ठेकेदाराला ५० टक्केपेक्षा कमी बिल अदा करण्यात आले आहे. या कामाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये.- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड