शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे काम आॅक्टोबरपासून बंद

By admin | Updated: April 16, 2017 04:35 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगर मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, तेथे जाण्याच्या वाहतूक समस्येमुळे संकटात सापडले आहे.

- अजय कदम, माथेरान

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगर मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, तेथे जाण्याच्या वाहतूक समस्येमुळे संकटात सापडले आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने एमएमआरडीएने २७ कोटींचा निधी घाट रस्ता तयार करण्यासाठी दिला असून, वन विभागाने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम आॅक्टोबर २०१६ पासून बंद आहे. खराब रस्त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच वेळी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने माथेरानच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.माथेरान या ब्रिटिशांनी शोधलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पुढील दीड महिना पर्यटकांची गर्दी असते. त्यात मुंबई या महानगरापासून सर्वात जवळ असलेल्या माथेरानला पर्यटकांची नेहमी पसंती राहिली आहे. मात्र, या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेले वाहतुकीचे दोन मार्ग अस्तित्वात आहेत. नेरळ-माथेरान मिनीट्रेन आणि नेरळ-माथेरान घाटरस्ता अशी व्यवस्था असलेल्या या दोन्ही वाहतूक मार्गाची अवस्था बिकट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनची सेवा मिनीट्रेन नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर ९ मे २०१६ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे देशातील धोकादायक घाट रस्त्यांच्या यादीत नेरळ-माथेरान घाट रस्त्याचा क्र मांक वरचा लागतो. कारण जागच्या जागी असलेली वळणे असलेला हा सात किलोमीटरचा घाट रस्ता पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारने अधिक रुंद आणि धोकादायक वळणे कमी करण्यासाठी एमएमआरडीएला निधी देण्यास सांगितले. प्राधिकरणने या घाटरस्त्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केला असून, मार्च २०१६ मध्ये रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी काँक्रीटची गटारे, संरक्षक भिंती, डांबरीकरण तसेच रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध असेल तेथे बगिचा असे नियोजन असलेल्या रस्त्याच्या कामास सुरु वात झाली. नेरळ हुतात्मा चौक ते जुम्मापट्टी या भागातील आरसीसी पद्धतीने गटारे आणि काही ठिकाणी नवीन, तर काही ठिकाणी जुन्या अवस्थेतील संरक्षक भिंती यांची कामे करण्यात आली. सप्टेंबर २०१६पासून ठेकेदार कंपनीने कर्जत वन विभागाच्या हद्दीत म्हणजे जुम्मापट्टीपासून पुढे रस्त्याचे काम माथेरानकडे सुरू केले. त्यावेळी या जमिनीचा ताबा असलेल्या वन विभागाच्या कर्जत येथील कार्यालयाने प्राधिकरणला रस्त्याचे काम करू देण्यास विरोध केला. तेव्हापासून रस्त्यावर कोणतेही नवीन काम केले गेले नाही. परिणामी प्रवासी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक झाल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने दिवाळी पर्यटन हंगाम लक्षात घेऊन रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी केली. एमएमआरडीएने दुरु स्तीस विरोध केल्यानंतर टॅक्सी संघटनेने टॅक्सीसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधिकरणला रस्त्याची डागडुगी करण्याचे आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने तात्पुरती दुरु स्ती केली होती. - वन विभागाचे अधिकारी अनिल लांडगे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी आणण्यात यावी आणि त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, यावर वन विभाग ठाम आहे. त्यामुळे २७ कोटी खर्चून पर्यटकांसाठी बनविण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला बंद ठेवावे लागले आहे. या सर्व घडामोडीत घाट रस्त्यातील सुरक्षित वाहतुकीचा विषय आणि पर्यटन वाढीचा, असे दोन्ही विषय मागे पडले आहेत.