शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील गर्डर टाकण्याचे काम एक तासात पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:32 IST

मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे गर्डर आज टाकण्यात आले.

कर्जत : मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे गर्डर आज टाकण्यात आले. मध्य रेल्वेने त्या कामांसाठी अडीच तासांचा पॉवर ब्लॉक घेतला होता. मात्र, अजस्त्र क्रे नमुळे अवघ्या तासात गर्डर टाकण्यात रेल्वे अभियंत्यांना यश आले.मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाचे लोखंडी गर्डर टाकण्यासाठी रविवारी ३ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने पॉवर ब्लॉक घेतला होता. पॉवर ब्लॉकची नियोजित वेळ १०.३० होती; परंतु पुण्याहून मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस उशिरा नेरळ येथून निघाल्याने पॉवर ब्लॉक अर्धा तास उशिरा म्हणजे ११ वाजता घेण्यात आला. त्याआधी मध्य रेल्वेचे मुंबई मंडळ अभियंता आर. के. यादव यांनी गर्डरची, तसेच ते उचलण्यासाठी आणलेल्या क्रे नची पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून पूजा केली. त्या वेळी रेल्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. बरोबर ११ वाजता अजस्र क्रे नच्या साह्याने लोखंडी गर्डर उचलला आणि फक्त पाच मिनिटांनी पुलाच्या खांबांवर ठेवला. त्यानंतर पुढील तिन्ही गर्डर पाऊण तासात टाकून पूर्ण झाले. त्यामुळे एका तासात नेरळ रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर टाकण्यासाठी आणण्यात आलेली अजस्त्र क्रे न २०० टन वजन उचलणारी होती. त्या वेळी या क्रे नमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास १०० टन वजन उचलणारी आणखी एक क्रे न तयार ठेवण्यात आली होती. मात्र, केवळ एका तासाच्या आत चारही गर्डर टाकण्यात मध्य रेल्वेला यश आल्याने अभियंता टीमचे कौतुक करण्यात आले. २१ मीटर लांबीचे चार गर्डर टाकल्याने आता पादचारी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आव्हान मध्य रेल्वे प्रशासनापुढे आहे.