शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

चौपदरीकरणासाठी बांधकामे पाडली, गडब येथे महामार्गालगत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:17 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पेण तालुक्यातील गडब येथील घरे व सार्वजनिक बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पेण तालुक्यातील गडब येथील घरे व सार्वजनिक बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात गडब येथील महामार्गालगतच्या दोन्ही बाजूची बांधकामे येत असून ती संपादित करण्यात आली असल्याने व तशा प्रकारच्या नोटिसा संबंधिताना देण्यात आल्या होत्या. शासनाच्या आदेशाचे पालन करीत येथील नागरिकांनी आपली बांधकामे काढण्यास सुरुवात केली, तर बहुतेक नागरिकांनी ती काढली होती. तर येथील बांधकामावर कारवाई करीत येथील बांधकामे पाडली, या वेळी नागरिकांनी कोणताच विरोध न करता प्रशासनाला सहकार्य केले. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अजय पाटणे, वडखळ पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.गडब येथील हनुमान मंदिर, नृसिंहसरस्वती मंदिर, दगडी शाळा, विहिरी या महामार्गात जात असल्याने गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. ज्या घरात आजी, आजोबा, वडील, आई असे सर्व जण राहिलो, माझे बालपण या घरात गेले, ते घर नष्ट होत असताना गहिवरून आले; परंतु शासकीय आदेशाचे पालन करून हे सर्व सहन करायला लागते. ज्या घराच्या ओट्यावर बसून गप्पा रंगायच्या तो ओटा काळाच्या पडद्याआड गेला, बालपणीच्या आठवणी, खेळायचे अंगण, शेजारी विस्थापित झाले. आता फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे नित्यानंद पाटील यांनी सांगितले.शासनाने गडब येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना मोठी दिरंगाई केली व केवळ सहा महिनेअगोदर मोबदला दिला. एवढ्या कमी कालावधीत येथील घरे खाली करण्यास सांगितले. एवढ्या कमी कालावधीत घरांचे बांधकाम होणे कठीण काम आसताना नागरिकांना भाड्याने जागा घेऊन राहणे हाच पर्याय होता. शेतीच्या कापणीचा हंगाम सुरू असतानाच शासनाने घरे खाली करायला सांगितली. त्यामुळे बाधितांची ताराबंळ उडाली.>व्यायामशाळा जमीनदोस्तगडब येथील आदर्श युवा संघटनेची व्यायामशाळाही महामार्गाच्या रुं दीकरणात गेली आहे. याच ठिकाणी सांस्कृतिक, कला, क्र ीडा व सामाजिक कार्याचे नियोजन केले जायचे. शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून व्यायामशाळा बांधून द्यावी, अशी मागणी संघटनेचे संचालक के. पी. पाटील यांनी केली.