शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमधील ३० ग्रामपंचायतींवर महिला राज, ६२ ग्रामपंच्यायतींचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:18 IST

अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सचिन शेजाळ, सर्वपक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली.

निखिल म्हात्रेअलिबाग : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (२१ जानेवारी) जाहीर करण्यात आली. यामध्ये ३० ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरुष सरपंचाच्या बरोबर स्त्रियाही समान हक्काने सरपंचपदी विराजमान होणार आहेत.अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सचिन शेजाळ, सर्वपक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली. यामध्ये ६२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर आता महिला राज असणार आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या मानतर्फे झिराड ग्रामपंच्यातीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी सासवणे व वाघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण खुला प्रवर्ग तर पेझारी ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे मनसुबे फोल ठरले आहेत.अनुसूचित जमाती महिलांकरिता थळ, नवेदर नवगाव, कुरकोंडी कोलटेंभी, कुर्डुस, बेलोशी तर अनुसूचित जमातीकरिता खानाव, कोप्रोली, खिडकी, वाडगाव, ताडवागळे, आगरसुरे या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी एकमेव चेंढरे ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कामार्ले, श्रीगाव, वरसोली, नागाव, रामराज, मानतर्फे झिराड, चिंचवली, माणकुळे, पोयनाड तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी रेवदंडा, झिराड, आंबेपुर, वरंडे, चरी, मापगाव, बोरघर आणि रेवस ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

सर्वसाधारण महिलांसाठी -सर्वसाधारण महिलांसाठी धोकवडे, शहाबाज, सहाण, कावीर, बेलकडे, शहापूर, वैजाळी, पेझारी, मुळे, सारळ, पेढांबे, बोरीस, आक्षी, आवास, मिळकतखार आणि कुरुळ त्याचप्रमाणे सर्वसाधारण खुल्या जागांसाठी रांजणखार डावली, वाघोडे, ढवर, बामणगाव, परहूर, कुसूंबळे, शिरवली, वेश्वी, वाघ्रण, नारंगी, खंडाळे, किहीम, सासवणे, सातिर्जे, सुडकोळी, चिंचोटी, चौल याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :Raigadरायगडsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत