शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव व लोणेरे परिसरात वादळी पाऊस, मुंबई-गोवा महामार्ग सुमारे तासभर बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 21:00 IST

या वादळी पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक झाडे पडल्याने हा महामार्ग सुमारे एक तास बंद झाला होता.

माणगाव: आज 6 नोव्हेंबर 18 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक झाडे पडल्याने हा महामार्ग सुमारे एक तास बंद झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तालुक्यातील अनेक रस्त्यावर झाडे व फांद्या पडल्या होत्या. तर अनेक ठिकणी विजेचे पोल वाकले होते, वीज तारा पडल्या. त्यामुळे एक दिवस संपूर्ण तालुका अंधारमय राहणार आहे. माणगाव तालुक्यात सलग तीन दिवस जोराचा पाऊस पडत असताना आज आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने बऱ्याच घरांच्या पत्र्याचे व कौलाचे छप्पर उडून गेल्याच्या घटना घडल्या. तर काही घरानवर झाडे पडली. तसेच महावितरणचे विजेचे पोल काही ठिकाणी वाकलेले आहेत तर काही ठिकाणी वीज वाहक तारा पडल्या असल्याने गोरेगाव व लोणेरेमधील आसपासचा भाग अंधारमय राहणार आहे.

या भागातील वादळी पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावर बसला असून, सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती.  महामार्गावर रेपोली, ऊसरघर, नवघर , लोणेरे या गावात मोठी झाडे पडल्याने संपूर्ण महामार्गावर अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. मात्र तत्काळ पोलीस यंत्रणेने जेसीबी बोलावून रस्त्यावरील झाडे  दूर करून वाहतूक पूर्ववत करून दिली. या सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे. आज आलेल्या या मुसळधार वादळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भाताची केलेली मळणी सुद्धा भिजली गेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी कडधान्ये पेरली आहेत. या आलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.