शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:41 IST

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत

रेवदंडा : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी चौल येथे काढले.चौल नाका येथे अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तटकरे बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून रोजगार निर्मितीचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन फसवे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री असून एकही उद्योग या जिल्ह्यात आणला नाही, ही मंत्रिपदाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असताना सरकार गांभीर्याने दखल घेत नाही असे सांगून गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतीचे, मच्छीमारांचे केलेले नुकसानाबाबत राज्य सरकार काही बोलत नाही. नजीकच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन विजय संपादन करण्याचा सल्ला तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.मेळाव्यात तालुक्यातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काही कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्याची पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र माला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, मांडवा ते रेवदंडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत खरसंबले व आसिफ किरकिरे यांनी केले.