शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 23:56 IST

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे.

मुरुड/ आगरदांडा : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचा विस्तार असून विविध वन्यजीव येथे वास्तव्य करून आहेत. शनिवारी सकाळी आठपासून ते पूर्ण दिवसभरात ही प्रगणना होणार आहे. फणसाड अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असून येथे पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.फणसाड क्षेत्रात २७ पाणवठे असून या ठिकाणी वन्य जीवांची मोजदाद करण्यासाठी वन कर्मचारी वृंदांनी मचाण बांधले आहे. मोजदादीसाठी निरीक्षण टॉवरची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. या प्रगणनेसाठी वनकर्मचारी यांच्याबरोबर निसर्गप्रेमी संस्था यांची सुद्धा मदत घेतली जाणार असून प्रगणनेचे काम अगदी चोखपणे बजावले जाणार आहे. एका मचाणवर तीन माणसे नियुक्त केली जाणार असून अशा २७ पाण्याची ठिकाणे आहेत तिथे रात्रभर जागता पहारा करून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राणी व पक्ष्यांची मोजदाद होणार आहे. या विशेष कामासाठी फणसाड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक बी.बी.बांगर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.पाणवठे ठिकाणाव्यतिरिक्त १४ नाईट व्हिजन कॅमेऱ्यांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. फणसाड अभयारण्यातील विविध ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेºयांच्या क्षेत्रात वन्यजीव कैद होऊन मोजदाद करताना मदत होणार आहे. त्याचप्रमाणे केतकीचा तलाव, विधुर धरण चाकाचा माळ व सावरट तलाव येथे सुद्धा टीम तैनात केली असल्याची माहिती प्रदीप चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.गतवर्षीची गणनाया अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये बिबट्या, सांबर,भेकरे, डुक्कर, शेकरु, पिसोरी, ससा, काळामांजर, रानमांजर, जवादा, साळिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी ,२७ प्रकारचे साप, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी ,९० प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्लू मॉरमॉन, मॅप व आदि फुलपाखरु दिसून येतात. गेल्या वर्षी प्राण्याची गणना केली त्यामध्ये बिबट्या, गिधाड, पिसोरी, ससा, काळामाजर, साळिंदर यांची संख्या पूर्णत: रोडवली होती. ही संख्या ० होेती. सांबर २, भेकरे २, डुक्कर ३, शेकरू १, रान मांजर १, मुंगुस १, माकडे १९, वानर ४ , मोर ६

टॅग्स :Raigadरायगड