शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानला पाणी महाग का? कमाईचा निम्मा भाग पाण्यावर होतो खर्च; व्यावसायिकांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:48 IST

कमाईचा निम्मा भाग पाण्यावर खर्च होत असल्याची व्यथा येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. 

- विजय मांडे

कर्जत : माथेरान शहराला नेरूळ येथून पंपिंग करून पाणी पुरवले जाते. मात्र, येथील पाणी प्रचंड महाग आहे. घरगुती वापरासाठी किमान  दर २६ रुपये व कमाल दर  ५३ रुपये प्रति एक हजार लिटर  इतका आकारला जात आहे. यामुळे येथील नागरिकांसह व्यावसायिकांना पाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कमाईचा निम्मा भाग पाण्यावर खर्च होत असल्याची व्यथा येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. 

येथील शारलोट लेक व सिम्पसन टॅंक या दोन तलावांची क्षमता एक टीएम सी इतकी वाढवावी किंवा शासनाने माथेरानसाठी प्राधिकरणाला अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. माथेरानकरांना पाण्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. पाणी दर कमी करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठकीचे आयोजन करणार, असे आ. महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

पाण्याचे दर अधिक का?    माथेरानला शारलोट लेक या एका तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावाची क्षमता केवळ १५० एमएलडी इतकी असल्याने पाणी पुरत नाही. त्यामुळे १९९० च्या दशकात राज्य सरकारने नेरळ येथून उल्हास नदीचे पाणी पंप करण्याची स्कीम राबवली आहे.     नेरळहून अडीच हजार फूट उंच पाणी तीन स्टेजमध्ये पंप करावे लागते. यासाठी लागणाऱ्या वीजेचे बिल हे एक कोटीच्या घरात जाते. त्यामुळे पाणी पट्टीच्या रूपाने हा खर्च वसूल केला जात आहे. 

कमाईचा निम्मा भाग पाण्याचे बिल देण्यातच जातो. सातत्याने वाढणाऱ्या पाणी दरांमुळे येथील व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. ज्या पद्धतीने शेती उद्योगाला सरकार आर्थिक मदत देत असते, तशीच मदत पर्यटनाला देण्याची गरज आहे.    - शैलेश भोसले, लॉजिंग व्यावसायिक

मुंबई महानगर पालिकादेखील ठाणे, नाशिक येथील धरणांतून पाणी पंप करते. मात्र, त्यांचे दर कमाल सहा तर किमान ३ रुपये इतके आहेत. मात्र, माथेरानला मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. यासाठी राज्य सरकारने एक कोटी रुपयांचे अनुदान जीवन प्राधिकरणाला दिल्यास पाणीदर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील.        - वर्षा शिंदे, व्यावसायिक 

टॅग्स :Karjatकर्जत