शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण आदिवासी वाडी गेली देवदर्शनाला; आज मतदानासाठी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:05 IST

कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व सात आदिवासी वाड्यांचा समावेश आहे.

- वैभव गायकरपनवेल : कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व सात आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. कर्नाळा अभयारण्यामुळे या ग्रामपंचायतीला वेगळे महत्त्व असून, ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण आदिवासी वाडीला देवदर्शनाच्या नावाने स्थलांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत खैराटवाडी ही आदिवासी वाडी असून, येथील लोकसंख्या २०० च्या आसपास आहे. तर वाडीत ५६ मतदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आदिवासी वाडीला गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन बसमध्ये भरून देवदर्शनाला नेण्याचा घाट काही राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी घातला. याबाबतचे वृत्त पसरू नये म्हणून खबरदारी घेत वाडीतील मतदारांना सोबत घेऊन न जाता, त्यांच्या कुटुंबीयांना देवदर्शन घडविले जात आहे. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तीच सध्या गावात दिसत आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना कोणतेही आमिष दाखविणे अथवा त्यांच्याकडून मत विकत घेण्याचा प्रयत्न करणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो. मात्र, अशा प्रकारामुळेही आचारसंहितेची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तीन दिवसांपासून बाहेर असलेले आदिवासी बांधव थेट रविवारी म्हणजे चौथ्या दिवशी मतदान करण्यासाठी गावात दाखल होणार आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खैराटवाडी आदिवासी बांधवांना देवदर्शन घडविण्याच्या प्रकाराची चर्चा संपूर्ण पंचक्र ोशीत आहे, तर राजकीय पक्षाने या ठिकाणी दहशत माजवल्याने कोणीही याबाबत बोलण्यास तयार नाही.संबंधित प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी माहिती घेतली जाईल आणि तथ्य असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या अ‍ॅडव्होकेट सुरेखा दळवी यांनी दिली.

टॅग्स :panvelपनवेल