शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कार्ले, खंडाळ्यात पांढरा कांदा काढणीची लगबग

By निखिल म्हात्रे | Updated: January 21, 2024 18:48 IST

विविध ठिकाणांहून ८०० हून अधिक माळींना मागणी.

अलिबाग - तालुक्यातील कार्ले, खंडाळा येथील पांढरा कांदा काढणीला सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. या कांद्याच्या माळी तयार केल्यावर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. कांद्याला पुणे, मुंबई, रत्नागिरी, नवी मुंबई येथून ८०० हून अधिक माळींना मागणी असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी सतीश म्हात्रे यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेली अनेक वर्षांपासून या परिसरातील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. येथील निम्म्याहून अधिक शेतकरी कापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसांत कांद्याची लागवड करतात. नोव्हेंबरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली होती. दोन महिन्यांत कांदा काढणी योग्य झाली आहे. गेली दोन दिवसांपासून कांदा काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. कांदा काढणीपासून त्याच्या माळी तयार करण्यासाठी स्थानिक कामगारांना रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. सतीश म्हात्रे यांनी त्यांच्या दोन एकर जागेत कांद्याची लागवड केली आहे. अलिबागचा कांदा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांतून, राज्यातून मागणी असते. या कांद्याला रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई, पुणे येथून मागणी करण्यात आली आहे. दरवाढीची शक्यतावाढत्या महागाईमुळे मजुरांच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी, कांद्याचे दर यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा बाराशे रुपये चार माळींमागे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे माळीमागे तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत. गेली अनेक वर्षांपासून कांद्याची लागवड करीत आहे. कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कांदा काढणीला सुुरुवात झाली असून, २६ जानेवारीपूर्वी बाजारात दाखल होईल, असा विश्वास आहे.- सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले-अलिबाग. रेन वॉटर पद्धत फायदेशीरयंदा कांद्याला लागवडीनंतर पाणी देण्यासाठी रेन वॉटर पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. पावसाच्या पाण्याप्रमाणे पिकाला पाणी दिले जाते. त्यामुळे वेळेबरोबरच पाण्याची बचतही झाली आहे. यंदा कांद्यासाठी पोषक वातावरण असून, अवकाळी पावसाचा फारसा परिणाम उत्पादनावर झाला नाही. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती उत्पादकांनी दिली. 

टॅग्स :alibaugअलिबाग