शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

यंदाच्या अर्थसंकल्पात मला काय दिले रे भाऊ ? कामगार, महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष; शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:15 IST

budget 2021 : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे. त्यामुळे भांडवलदारांचेही व गरिबांसाठी कोणताही बदल झाला नसल्याचे या अर्थसंकल्पातून दृष्टीस पडत आहे. त्यामुळे बजेटने मला काय दिले, असा सूरही सर्वसामान्यांतून उमटत आहे. काही राज्यांची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याने इतर राज्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचा सामना आता करावा लागणार आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती झाली आहे. कमाल आश्वासने किमान कामगार तर महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे आर्थिक सर्वेक्षणात बेरोजगारीबद्दल कोणतीही स्पष्टता आढळत नाही.  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे घर चालविणे आता तारेवरची कसरत झाली आहे. भाजीपाल्यासह इतर वस्तूंवरील भाववाढ झाल्याने आम्हा गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. - निहा राऊत, गृहिणीयंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी मात्र कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.                   - राकेश जैन, दुकानदारआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजना, मोठमोठ्या घोषणा आणि आकडे फेकण्यापलीकडे काहीही नवे नाही. केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली.                - अक्षय म्हात्रे, रिक्षाचालकशिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटींकची, कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ३ हजार कोटींकच्या तरतुदीमुळे ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत होण्यास मदत होईल.                          - ॲड. अंकित बंगेरायुवकांना रोजगार निर्मितीसाठी अधिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणे गरजेचे होते. यामुळे निराधारांना आधार मिळणे शक्य झाले असते, तर बेरोजगारी हटविण्यासाठी लघु उद्योगांना उभारी देण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणे गरजेचे होते.         - साहील सय्यद, युवककोरोनामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देणे गरजेचे होते.          - परेश गजने, शेतकरीशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्के असला पाहिजे. पण, आज तो फक्त २ टक्के आहे, त्यामुळे ही घोषणादेखील पोकळ आणि फसवी आहे.            - जयश्री पाटील, भाजी विक्रेते कोविड व्हॅक्सिनसाठी चांगली तरतूद केली आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेमुळे आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. नवीन हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी तरतूद आहे.                            -डाॅ. अर्चना सिंहपाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेमुळे सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असून, बँक खात्यात असलेल्या रकमेला ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच दिला आहे.         - विक्रम शेठ, पेट्रोलपंप चालकचांगल्या याेजना राबविण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामध्ये जलजीवन मिशनचा समावेश आहे. त्यामुळे घराेघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य हाेणार .                             - हर्षदा म्हात्रे-मयेकर, गृहिणी बसस्थानककोरोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी किमान पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी विचार करायला हवा होता.  बाजारपेठेत चर्चाइंधनाची दरवाढ म्हणजे महागाईला दिलेले आमंत्रण आहे, तर दुसरीकडे कार्पोरेट सेक्टरला अधिक महत्त्व दिले असल्याने ग्राहक आणि दुकानदार यांच्यात काही प्रमाणात दरी निर्माण होणार आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Raigadरायगड