शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
3
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
4
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
5
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
6
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
7
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
8
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
9
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
10
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
11
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
12
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
13
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
14
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
15
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
16
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
17
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
19
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत, सरपंचांना अटीमध्ये बांधण्याबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 07:09 IST

Raigad : सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे.

रायगड : जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी राेजी हाेत आहेत. नवीन नियमांनुसार आता सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका उरकल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजाराला आळा बसणार आहे. मात्र, सातत्याने सरपंचांनाच अटींमध्ये का बांधले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका पार पडल्यानंतर जाहीर हाेणार असल्याने या निर्णयाचे काही सरपंचांनी स्वागत केले आहे, तर काहींना हा निर्णय पटलेला नाही. आता सरपंचपदासाठी घाेडेबाजार हाेणार नाही, काेणालाही निवडणूक लढवता येणार आहे. ज्या दिवशी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार हाेते, त्याच दिवशी सरकारचानिर्णय आल्याने प्रशासनाला आरक्षणाची साेडत रद्द करावी लागली हाेती. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक ८८ आरक्षण आता निवडणुका पार पडल्यानंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजार थांबण्यास मदत मिळणार आहे. पैशांच्या अपव्ययाला लगाम बसणार आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. सरकार नेहमीच विविध प्रयाेग करताना सरपंचांनाच टार्गेट करते हे चुकीचे आहे.    - दिग्विजय पाटील, सरपंच, पेढांबे

सरपंचपदासाठी आरक्षण निवडणुका पार पडल्यावर काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. सामान्याला निवडणूक लढवता येणार आहे. ज्यांना निर्णय पटलेला नाही त्यांना मात्र निर्णयाचा त्रास हाेणारच आहे.    - श्रीदास म्हात्रे, सरपंच, पेझारी

काय म्हणणे?सरपंच हा ग्रामीण राजकीय, सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. दरवेळी निर्णय बदलण्यात येतात. सरपंचांनाच विविध अटी आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे.

सरपंच सेवा संघाचे म्हणणे काय?सरकारने याेग्य ताेच निर्णय घेतला आहे. मात्र कधी थेट सरपंच निवडून आणण्याचे जाहीर केले जाते, कधी वेगळाच निर्णय घेण्यात येताे. सरकार बदलले की साेयीस्करपणे निर्णय बदलण्यात येतात. हे काेठे तरी थांबले पाहिजे.

टॅग्स :Raigadरायगड