शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा परिषदेची वेबसाइट अपडेट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:56 IST

डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे. त्यामुळे डिजिटल युगामध्ये वावरताना विविध सरकारी यंत्रणा अपडेट राहिल्या नाही तर, त्या यंत्रणाच कुचकामी ठरण्याची शक्यता असते. रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर बदली झालेल्या अधिकाºयांची नावे असणे, नवीन अधिकाºयांचे फोटो अपलोड न करणे, विविध प्रकारची माहिती अद्ययावत नसणे, अशा कारणांमुळे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ जगाच्या बरोबरीने नसल्याचे दिसून येते.कुलाबा जिल्ह्यामध्ये लोकल बोर्ड अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्याचे मुख्यालय अलिबागला असावे की पेणला याबाबत त्यावेळी वाद सुरू होता. १९६२ मध्ये पंचायत राज अस्तित्वात आल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेची स्थापना झाली. सुरुवातीला जिल्हा परिषदेची काही खाती पेण, तर काही खाती ही अलिबागला होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येत होत्या. ८ जून १९७९ रोजी प्रभाकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर दहा दिवसांमध्ये सर्व खाती अलिबागला आणली.१९८४ साली त्यांनी रायगड जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभी केली. त्या इमारतीला शिवतीर्थ असे नाव दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. जिल्हा परिषदेला आयएसओ नामांकनही मिळाले आहे. विविध राष्ट्रीय पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. जिल्हा परिषदेची यशस्वी वाटचाल सुरू असताना जिल्हा परिषद कायमच जगाच्या सोबत राहावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात आले. त्यामुळे संगणकाच्या एका क्लीकवर सामान्यांना विविध सरकारी योजनांची माहिती, निविदा प्रक्रिया, सन्मानीय पदाधिकारी, सदस्य, अधिकारी त्यांची नावे, फोन नंबर याची माहिती उपलब्ध झाली. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. जगभरात घडणाºया घटना, विचार, माहिती यांची देवाण-घेवाण वेगाने केली जात आहे. डिजिटल युगामध्ये कोणी मागे पडला तर, त्याला मागासलेला अथवा डिजिटल युगातील निरक्षर समजला जातो. त्यामुळे सर्वच जण जगाच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र, रायगड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहिले, तर ते अपडेट नसल्याचे दिसून आले. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून अद्यापही अविनाश गोटे यांचेच नाव आणि फोटो आहे. वास्तविक पाहता गोटे यांच्या जागी जगन्नाथ भोर हे आहेत. त्यांचा फोटो, फोन नंबर नसल्याने माहिती उपलब्ध होत नाही.

टॅग्स :Raigadरायगड