शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:08 IST

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक जण आपल्याला हवी असणारी माहिती ...

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक जण आपल्याला हवी असणारी माहिती सर्च करतो. मात्र, ही सगळी माहिती सायबर क्रिमिनल गोळा करत असतात. त्यातून ते आपण काय सर्च करतो, हे लक्षात घेऊन फेक ॲप आणि लिंक तयार करतात. त्यातून ते अनेकांना आपल्या जाळ्यात ओढतात, अशी माहिती समोर आली आहे.

देशात ८५ कोटी नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करीत असतात. यामुळेच सायबर क्रिमिनल इंटरनेटवर विविध माध्यमातून अशा नागरिकांवर लक्ष ठेवून असून ते अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची ऑनलाइन फसवणूक करीत असल्याची माहिती सायबर विभागाचे राज्याचे प्रमुख संजय शिंत्रे यांनी दिली. राज्य शासनाकडे दररोज एक हजार तक्रारी यासंदर्भात प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी त्यांनी सायबर गुन्हेगारीविषयक आयोजित ‘हॅकेथॉन २०२३’ मध्ये दिली.

२०२० मध्ये मुंबईमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला होता. त्यामागेदेखील हॅकर्स असल्याची शक्यता शिंत्रे यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना काळापासून ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार वाढला आहे. बहुतांशी नागरिकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. 

लवकरच सायबर सिक्युरिटी प्रकल्पn सायबर क्रिमिनल ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना टार्गेट करत असतात. त्यामुळे अनोळखी फोन कॉल्स, एसएमएस आदींबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. n नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये राज्य सरकार लवकरच सायबर सिक्युरिटी प्रकल्प उभारणार आहे. या ठिकाणी सायबर सुरक्षेबाबत काम पाहिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

१९३० हेल्पलाइनचा वापर करण्याचे आवाहन सायबर क्राइमसंदर्भात तक्रार करण्यासाठी १९३० या हेल्पलाइनचा वापर करावा. या हेल्पलाइनवर तक्रार केल्याने त्वरित तक्रार दाखल करून ती थेट स्थानिक पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जाते.इंटरनेटवर ज्या गोष्टी आपण सर्च करतो, त्यावर लक्ष ठेवून हुबेहूब तशाच प्रकारचे ॲप प्ले स्टोअरमध्ये इन्स्टॉल केले जातात. या फेक ॲपचा वापर केल्यास त्वरित आपली माहिती या सायबर क्रिमिनलकडे जाते. फेक एसएमएस आणि लिंकदेखील याचाच भाग असल्याचे संजय शिंत्रे यांनी स्पष्ट केले.