शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये नाले रंगले रंगीत पाण्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 02:57 IST

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाचे प्रमाण कमी होताच दरदिवशी गटारात विविध रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाचे प्रमाण कमी होताच दरदिवशी गटारात विविध रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार गेल्या आठवडाभर सुरू आहे. या प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने रसायनयुक्त पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. महाड एमआयडीसीमध्ये रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण अधिक आहे. यातून बाहेर पडणारे सांडपाणी हे घातक असल्याने हे पाणी सांडपाणी केंद्रात प्रक्रि या करून खाडीत सोडले जात आहे. असे असले तरी आजही नाल्यावाटे सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. गेले काही दिवसांपासून महाड एमआयडीसीमधील नाल्यात कारखान्यांतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नाल्यातून पुन्हा रंगीत पाणी वाहत असल्याचे दिसून येते.या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दुर्लक्ष केल्याने या पाण्याचा रंग अधिक गडद होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. शुक्र वारी आपटे आॅरगॅनिकच्या समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यातून जाणारे रंगीत पाणी थेट टेमघर नाल्यात जाऊन मिळत होते. अशाच प्रकारे रविवारी देखील औद्योगिक परिसरातील बी झोनमधून निळ्या रंगाचे पाणी दिसून आले. या प्रकाराचा शोध घेण्यात आला तेव्हा हे पाणी बिरवाडीजवळील मल्लिकार्जुनेश्वर मंदिराच्या मागील बाजूने येत असल्याचे स्पष्ट झाले.एकीकडे महाड औद्योगिक वसाहतीमध्ये विविध उपक्र म राबवून पुरस्कार प्राप्त करणारी महाड उत्पादक संघटना काम करत असतानाच दुसरीकडे मात्र नाल्यात रासायनिक रंगीत पाणी दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सीईटीपीनेनमुने केले गोळारविवारी आढळूनआलेल्या रंगीत पाण्याबाबत सीईटीपीने देखील नमुने गोळा केले आहेत. मात्र पाणी सोडण्याचे प्रकार हे रात्रीच्या वेळेस होत असल्याने दुपारपर्यंत रासायनिक पाण्याचे अंश तळाशी जाऊन वरील भागात असणारे पाण्याचे नमुने तपासणीत काहीच आढळून येत नाही.आमच्यापर्यंत ही माहिती आल्यानंतर आम्ही नमुने गोळा केले आहेत. पाणी कोणी सोडले, ते कुठून येत आहे याचा शोध घेतला जात आहे- निखील भोसले, सी.ई.टी.पी. महाड