शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:44 IST

पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. परंतु निधी मिळत नसल्याने या योजना रखडल्या आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या या योजना पूर्ण करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्यात गिरवले, खैरवाडी, अकुळवाडी, गुळसुंदे, कोळखे, सोमटणे, पोसरी, नितळस, कर्नाळा, शिरढोण, नेवाळी, देवळोली, चिंध्रण या १३ गावांमध्ये लाखो रु पये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. यातील नेवाळी, देवळोली, चिंध्रण, खैरवाडी, अकुळवाडी, सोमटणे, पोसरी येथील योजनांचे काम अर्धवट असून देखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर गिरवले, गुळसुंदे, कोळखे, नितळस, कर्नाळा, शिरढोण येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.या १३ गावातील प्रत्येक योजनेला ४ ते५ वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नळ पाणी योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. १३ गावातील योजनेसाठी अंदाजपत्रकीय ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रु पये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख ६४ हजार रु पये खर्च करण्यात आले आहेत. तर या योजना पूर्ण करण्यासाठी अद्यापही ५ कोटी ६८ लाख ५४ हजार रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्याचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण होवू लागले आहे. तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे नैना प्रकल्पाचा घटक झाली आहेत. भविष्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक पनवेल तालुक्यात होणार आहे. निवासी व औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाणी हीच सर्वात गंभीर समस्या आहे. भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुक्त पनवेल तालुका करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. रखडलेल्या योजना वेगाने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.गावनिहाय पाणीपुरवठा योजनेचा तपशीलनिधीअभावी पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला की कामे पूर्ववत सुरू करून पूर्ण केली जातील.- आर. डी. चव्हाण,उपअभियंता पाणीपुरवठा विभागच्१३ जलकुंभासाठी ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख रुपये खर्च झाले असून कामे पूर्ण करण्यासाठी५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या