शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील जलसाठा गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी घटला, ६०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध

By निखिल म्हात्रे | Updated: February 19, 2024 20:34 IST

गेल्या वर्षी ७७.३२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात पाणीसाठा घटला आहे गेल्या वर्षी याच महिन्यात २८ धरण क्षेत्रात या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६०.२८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.तर मागील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७७.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अजूनही पुढील पावसाळा सुरू होण्यासाठी चार महिने शिल्लक आहेत.

रायगड जिल्ह्यातील पाणीसाठा कमी होत असताना उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरून क्षेत्रात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात सर्वाधिक ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील दहा धरणात ५० टक्के पेक्षा कमी पाणी साठा उपलब्ध आहे.रायगड जिल्ह्यात रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत  २८ धरणे येत असून या २८ धरण क्षेत्राततील पाण्यासाठयामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध,तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतार वाडी धरण क्षेत्रात ७० टक्के पाणी साठा, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ८० टक्के पाणी साठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरण क्षेत्रात ६२ टक्के पाणी साठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, ढोकशेत धरणक्षेत्रात २० टक्के पाणी साठा उपलब्ध,कवेळे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध,उन्हेरे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात ७७ टक्के पाणी साठा उपलब्ध,रानीवली धरण क्षेत्रात ३९ टक्के पाणी साठा उपलब्ध,म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंद धरण क्षेत्रात ५४ टक्के पाणी साठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात ४६ टक्के पाणी साठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ७१ टक्के पाणी साठा उपलब्ध,अवसरे धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, डोणवत धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध,पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध,बामणोली धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध,उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात