शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूरवाडी स्टेशन परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:54 IST

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते.

- संजय गायकवाडकर्जत  - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते. तर काही लोकांना डोंगर उतरून कोंढाणे धरणात साचलेले पाणी आणण्यासाठी डोंगर उतरण्याची कसरत करावी लागते.कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमध्ये असलेले स्टेशन ठाकूरवाडी हे गाव १५० घरांची लोकवस्ती असलेले गाव. तेथील लोकांसाठी शासनाने दोन विहिरी पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून खोदल्या आहेत, त्या विहिरी जानेवारी महिन्यात आटल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची पाण्यासाठी गेले तीन महिन्यांपासून दमछाक सुरू आहे. त्यातही एका विहिरीत नैसर्गिक झऱ्यातून काही हंडे पाणी साचत असल्याने ते पाणी घरटी मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी नंबर लावून ठेवले आहेत. १५० घरांची वस्ती असल्याने आठवड्यातून दोनदा दोन हंडे पाणी एका कुटुंबाला त्या विहिरीवर मिळते.वाडीत जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे. त्यातही काही ठरावीक गाड्यांना स्टेशन ठाकूरवाडी येथे टेक्निकल थांबा दिला आहे. मुंबई पुण्याला जाताना सकाळी दोन आणि सायंकाळी एक गाडी तेथे एक मिनिटे थांबतात. तर पुण्याकडून मुंबई जाणाºया दोन गाड्यांना तेथे टेक्निकल थांबा दिला आहे. अन्य पर्याय म्हणजे पायांना वाहन करत डोंगर उतरून परतावे लागते. याशिवाय स्टेशन ठाकूरवाडी येथील महिला पाण्यासाठी डोंगर उतरून कोंढाणे धरण गाठतात. साधारण एक तासभर चोची, मुंढेवाडी डोंगर उतरून पाणी शोधण्याचा असतो. कारण उल्हास नदीचे उगम असलेल्या त्या पात्रात फार तुरळक पाणी असते. अशा वेळी तेथे नदीपात्रात डवरे खोदून पाणी हंड्यात ओतावे लागते.पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आमच्यावर गावात सासरी म्हणून आल्यानंतर दुसºयाच दिवशी सुरू होते. आम्ही वयाचा विचार न करता पाण्याचे प्लास्टिक पिंप घेऊन घरातून बाहेर पडतो आणि पाणी घेऊन घरी पोहोचतो. ही आमचा दररोज दिनक्र म झाला आहे.- आवडाबाई हिंदोळा, ग्रामस्थ

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई