शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन योजना नसल्याने कर्जतमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:08 IST

नियोजनाअभावी उद्भवली परिस्थिती; पंचायत समिती काम करीत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे. मागील वर्षात कोणत्याही नळपाणीयोजनांवर पंचायत समितीने पंधरावा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणीयोजना आहेत, त्या स्थितीत असून पाणीपुरवठ्यासंबंधी नवीन योजना राबविल्या गेल्या नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागल्याने तालुक्यात पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्येक पंचायत समिती सदस्याला सेसचा निधी द्यावा, असे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र, कर्जत पंचायत समितीमध्ये हा निधी वर्ग करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातील निधीचे वाटप सर्व पंचायत समिती सदस्यांना नियोजन करून केले नाही. त्यामुळे आदिवासी भागात पाणीपुरवठ्यासंबंधीची कामे मागील वर्षभरात वेळेवर करता आली नाहीत, असा आरोप पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा यांनी केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्रामुख्याने पाणीपुरवठ्यावर खर्च करावा, अशी सूचना असताना मागील वर्षात कर्जत पंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासीवाड्या आपल्या नादुरुस्त नळपाणीयोजनेच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर सातत्याने पाणीटंचाई अनुभवणाऱ्या आदिवासीवाड्या नळपाणीयोजनेच्या व पाणीपर्याय वाढवून देण्यासाठी आवश्यक निधीच्या मागे लागल्या होत्या. मात्र, मागील वर्षात कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून नळपाणीयोजनांची दुरुस्ती झाली नाही किंवा कामेही झाली नाही. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व्हावी, असे सदस्य ओरडून सांगत असूनही पंचायत समितीचे प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांना कोणतीही किंमत कर्जत पंचायत समितीमध्ये राहिली नाही, असा आरोपही विरोधी पक्षाचे सदस्य करीत आहेत.

nपंचायत समितीच्या सर्व सदस्यांना सेस निधीचे समांतर वाटप करणे, ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना कळविली आहे. असे असताना आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी भागातील पंचायत समिती सदस्य हिंदोळा यांनी केली आहे.nदुसरीकडे सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. मग, मागील वर्षात पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकही रुपया खर्च न करणाऱ्या कर्जत पंचायत समितीमधील पदाधिकारी-अधिकारी हे आदिवासी आणि दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरवर्षी आम्हाला टँकरने व तेही चार दिवसांतून एकदाच पाठवले जाणार आहे काय? आमच्यासाठी चांगली पाणीयोजना शासन राबविणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांनी उपस्थित केले आहेत.

'कर्जत पंचायत समितीने मागील वर्षी २०२० मध्ये २५ आदिवासीवाड्या आणि सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. या वर्षीदेखील पाणीटंचाईग्रस्त वाड्या आणि गावांना टँकरने पाणी देण्याचे नियोजन केले आहे.-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

 

टॅग्स :WaterपाणीKarjatकर्जत