शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यातील ८ गावे, ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:55 IST

शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.

म्हसळा : यंदा म्हसळा तालुक्यातही पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्यातच शासनाने लघू पाटबंधारे विभागामार्फत ऐन पाणीटंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत, याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.पावसाच्या अवकृपेचा म्हसळा तालुक्यालाही चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे म्हसळा तालुक्यातही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. म्हसळा तालुक्यातील खरसई त्याचप्रमाणे पाभरे व इतर धरणे पावसामध्ये तुडुंब भरलेली असतानाच ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाणी विसर्ग केल्याने तालुक्यातील संबंधित पाभरे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना काम सुरू असल्यामुळे बंद आहे. त्याचा फटका आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार आदी सदस्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. या समितीने शासनाला लागलीच पाणीपुरवठा करण्यासाठी दखल घ्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करू किंवा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला आहे.युती शासनाच्या कार्यकाळात तत्कालीन टंचाईग्रस्त तोंडसुरेपंचक्र ोशीमधील मूळगाव तोंडसुरे, सकलप-खारगाव खुर्द, रेवळी, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे ही आठ गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणेकोंड, आगरवाडा येथील बौद्धवाडी या चार वाड्यांंकरिता म्हसळा पाभरे धरणामधून विंधण विहिरीमार्फत मोठ्या खर्चाची तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. शासनाची ही योजना काही तांत्रिक अडचणी वगळता गेली २० वर्षे सातत्यपूर्ण कार्यान्वित आहे. या योजना रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, मोठ्या उत्पन्नाची व तेवढीच खर्चिकही आहे. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत: धरणाचे उगमस्थान असलेल्या पाण्यावर अवलंबून असल्याने आणि हे धरण नादुरु स्त झाल्याने त्याच्यादुरु स्तीकरिता धरणातील बहुतांश साठवून ठेवलेले पाणी विसर्ग करण्यात आले आहे. हे दुरु स्तीचे काम शासनाचे लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेतले आहे.धरणात पाणीसाठा नसल्याने येथील पाणी योजनेच्या सर्व विहिरी आटल्या आहेत, त्यामुळे त्याचा मोठा फटका पाभरे गाव, खारगाव बुद्रुक, सुरई येथील योजनांसह मोठ्या लोकवस्तीच्या तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील आठ गावे आणि चार वाड्यांना बसला आहे. या गावांना शासनाने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.पाभरे धरणातील पाण्याचा विसर्गआठ गावे, चार वाड्यांची नपापु योजना पाभरे धरणाच्या पाणी स्रोतावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी या धरणाच्या दुरु स्तीला लघू पाटबंधारे विभागाने धरणावर अवलंबून असलेल्या योजना समितीना काहीही माहिती न देता ऐन टंचाईकाळात धरणातील पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे योजनेचे विहिरीतील पाणी आटले आणि आमची योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. आम्ही रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघू पाटबंधारे विभाग, गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन सांगितले.त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही ही बाब गंभीर असून पूर्वी ही गावे टँकरग्रस्त होती ती नपापु योजनेने टँकरमुक्त झाली होती. आता शासनानेच ऐन उन्हाळ्यात पुन्हा आठ गावे आणि चार वाड्या टँकरग्रस्त केल्या आहेत. धरणदुरु स्तीचे हे काम मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घ्यायला हवे होते किंवा पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, असे तोंडसुरे नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी