शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:15 IST

नागरिकांचे हाल : टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

कर्जत :  उन्हाळा सुरू होताच कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील १७ गावे आणि ५९ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, तेथे पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना उजाडला की पाणीटंचाई जाणवू लागते. त्यावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधण विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे, विहिरीमधील गाळ काढणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी निधी राखून ठेवला आहे.कर्जत तालुक्यातील आनंदवाडी, भगताचीवाडी, काठेवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, पाली धनगरवाडा, आसलवाडी, नाण्यांचामाळ, भुतीवलीवाडी, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, धामणदांड, बोरीचीवाडी-कळंब, काळेवाडी, मिरचुलवाडी, चिंचवाडी, अंथराटवाडी, बेलचीवाडी, आषाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, भागूचीवाडी-१,   भागूचीवाडी-२,  सावरगाव ठाकूर वाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, गरुडपाडा, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंगवाडी, कोतवालवाडी,  कळकराई,  बेकरेवाडी, माणगाव ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, कोतवालवाडी, नवसुचीवाडी, जांभूळवाडी-वारे, खाड्याचापाडा, मधलीवाडी, चाहुचीवाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, भोमळवाडी, दामत कातकरीवाडी आणि नांदगाव विठ्ठलवाडी येथे पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. कृती आराखडा तयार कर्जत तालुक्यात २०२० मध्ये १४ गावे आणि ५६ आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी १७ गावे आणि ५९ वाड्यांना पाणीटंचाई भासेल, असे गृहीत धरून पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भुतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंथराट नीड या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई