शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उरण रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:53 IST

खारकोपर ते उरण ही  बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचू लागले आहे.

उरण : उरण खारकोपर दरम्यानची लोकल सुरू होण्यापूर्वीच उरण स्थानकांच्या भुयारी मार्गात पाणी साचू लागले आहे. हे भुयारी मार्गच बंद आहे. त्यामुळे उरण स्थानकांच्या भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम आहे. 

खारकोपर ते उरण ही  बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे ही लोकल सुरू होण्यापूर्वीच  या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली आहे. खाडी परिसरात असलेल्या या स्थानकात भुयारी फलाट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे व समुद्राच्या भरतीचे पाणी स्थानकांच्या भुयारी मार्गात येऊ लागले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

उरणमधील  तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद घेतला होता.या क्षणाचे चित्रण इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित करुन कामाची पोलखोल केली होती.हे प्रसारण दिल्ली दरबारापर्यत पोहचल्याने पीएमओ विभागाने या प्रसारणाची दखल घेतली गेली आहे.या रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात यावे यासाठी रेल्वे प्रशासन, खासदार, आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी पीएमओकडूनच अद्यापही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने तुर्तास तरी उद्घाटन रखडलेले आहे.

उरण पर्यंत लोकल सुरू होण्याची येथील नागरीक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्या आहेत. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले आहे.पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचू लागल्याने या स्थानकातील दोन्ही भुयारी मार्ग लोखंडी बार लावून भुयारी मार्गच बंद करण्यात आले आहेत. तसेच पाणी उपसा करण्यासाठी  कायमस्वरूपी पंपही बसविण्यात आले आहेत.

टॅग्स :uran-acउरण