शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीत जलवाहिनीला गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 23:14 IST

प्रतिदिन हजारो लिटर पाणी वाया : दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या वाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुरुस्ती न झाल्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यांत हे पाणी साचल्याने ई-झोनमधील गटाराला तलावाचे स्वरूप आले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे या परिसरातील कंपन्यांच्या कामगारांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ही गळती सुरू असूनदेखील महाड औद्योगिक महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक परिसराला पोलादपूरमधील रानबाजिरे धरणातून पिण्याच्या पाण्याचा आणि औद्योगिक वापरासाठी पुरवठा केला जातो. ज्या वाहिनीमधून हे पाणी पुरवले जाते ती जुनी झाली आहे. काही ठिकाणी ती बदलण्यात आली असली तरी काही ठिकाणी जीर्ण वाहिनीतूनच पाणी पुरवठा होत असल्याने गळती सुरू होते.

महाड एमआयडीसीमधील ई-झोनमध्ये एम. एस. केमिकल, अमृत केमिकल, कन्सेप्ट, जॉयसन अमोनिझ, मॅक आॅर्गनिक्स, जेट इन्सुलेशन, ओमकार केमिकल, फ्लुबॉर, खंडोबा इंडस्ट्रीज अशा विविध छोट्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना पुरवठा होत असलेली वाहिनीला ओमकार केमिकल जवळ गळती लागली आहे. २०१८ च्या मे महिन्याच्या आधीपासून ही गळती सुरू आहे. या बाबत परिसरातील कंपन्यांनी पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे पत्र महाड औद्योगिक महामंडळाच्या महाड कार्यालयाला दिले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हे पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

दुरु स्तीकरिता या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात उन्हाळ्यातही पाणी साचून राहत होते. शेजारील कंपन्यातील रासायनिक पदार्थ पावसाच्या पाण्याने याच खड्ड्यात येऊन साचले आहेत, यामुळे खड्ड्यातील पाणी रंगीत बनले आहे. ज्या ठिकाणी पाइपलाइन आहे त्या ठिकाणी महाड औद्योगिक परिसरातील गटारदेखील आहेत. यामुळे या लिकेजमधून बाहेरील पाणीही पाइपलाइनमध्ये शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असण्याची शक्यता आहे, यामुळे या परिसरातील कारखान्यांच्या कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र, कंपन्यांमध्ये पाणी शुद्धिकरण यंत्रणा असली तरी महाड परिसरातील कंपन्यांना एमआयडीसीच दूषित पाणी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

जलवाहिनी जुनी असल्याने दुरु स्तीसाठी निविदा काढली होती, निविदा प्रक्रिया पूर्ण नसल्याने कामासाठी विलंब झाला होता. आता कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू के ले जाईल.- एस.एस.गीते, उपअभियंता, एमआयडीसी, महाड 

तांत्रिक त्रुटींमुळे पाणी वायाच्ई-झोनमधील कंपन्यांनी ही बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र, पाइपलाइनच्या पाण्याचा फ्लो मोठा असल्याने बाहेरील पाणी आत जाणे शक्य नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून वेळ मारून नेली आहे.च्एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू असून महाड औद्योगिक क्षेत्रात मात्र रानबाजिरे धरणातील पाणी एमआयडीसीच्या तांत्रिक चुकांमुळे वाया जात आहे. यामुळे पाणीगळती रोखली जावी, अशी मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया घालवले जात असल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी