शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदैवत धापया महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:25 IST

कर्जतकरांचे ग्रामदैवत धापया महाराज यांचा अक्षय्यतृतीयेला उत्सव असतो.

कर्जत : कर्जतकरांचे ग्रामदैवत धापया महाराज यांचा अक्षय्यतृतीयेला उत्सव असतो. दोन दिवस चालणाºया या उत्सवाला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप मंदिराच्या गाभाºयातील पाणी कमी न झाल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कर्जत रेल्वे स्टेशनच्या लगत असलेल्या बाजारपेठेतून शहराच्या मध्यवर्ती भागातून धापया मंदिरच्या बाजूने, बर्फ कारखाना, पोलीस वसाहत, नगरपरिषद कार्यालय, करमरकर वकील यांच्या इमारतीच्या बाजूने उल्हास नदीला मिळालेला मुख्य नाला अनेक वर्षांपासून त्याच जागेतून वाहत आहे. या नाल्यामुळे पावसाळ्यात मंदिराचा गाभारा पाण्याने पूर्णपणे भरलेला असतो. मात्र, उन्हाळ्यात या नाल्याची साफसफाई योग्य पद्धतीने होत असल्याने पाणी त्या ठिकाणी झिरपत नाही. नाल्यातील पाणी वाहत असल्याने दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत मंदिराच्या गाभाºयातील पाणी आटते. मात्र, यावर्षी एप्रिल महिना अर्धा संपला आहे तरी गाभाºयातील पाणी आटले नाही त्यामुळे भाविक चिंतेत आहेत.नगरपरिषद प्रशासनाने या मुख्य नाल्याचे बांधकाम हाती घेतले आहे. लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे. बर्फ कारखान्याजवळ नाल्यावर असलेली अरुंद मोरी रुंद करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, हा नाला माझ्या जागेतून जात आहे असे सांगून अनिल जोशी यांनी त्या मोरीचे काम बंद पाडून आठ दिवसांपूर्वी कर्जत न्यायालयातून कामावर स्टे आॅर्डर घेतली आहे, त्यामुळे सध्या मोरीचे काम बंद आहे.काही प्रमाणात वाहत असलेला नाला या कामाच्या अडवणुकीमुळे वाहण्याचा बंद झाला आहे. नाल्यात प्रचंड प्रमाणात कचरा अडकून नाल्याचे वाहणे बंद झाले. आज ते पाणी त्याच ठिकाणी जमिनीत झिरपत आहे. नाल्यात पाणी झिरपत असल्याने मंदिराच्या गाभाºयातील पाणी कमी होत नाही. दरम्यानच्या काळात ७ मार्च रोजी या विभागाच्या नगरसेविका मधुरा चंदन यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे व नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना पत्र देऊन गुजराथी वाडा ते बर्फ कारखान्यापर्यंतच्या नाल्यात पूर्णपणे कचरा पडून वाहण्यास अनुकूल राहिला नाही, त्यामुळे नाल्याचे सांडपाणी आजूबाजूला साचून या परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच ग्रामदेव धापया महाराज मंदिराचा गाभारा पाण्याने भरला आहे याबाबत लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.>नाल्याचे बांधकाम सुरू होईल तेव्हा होईल. मात्र, नाल्यात साठलेला कचरा नगरपरिषद प्रशासनाने साफ करावा जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.- महेंद्र चंदन, अध्यक्ष-धापया देवस्थान समितीनगरपरिषदेचे सफाई कामगार लावून नाला साफसफाई करण्यात येईल. धापया मंदिर उत्सवास कोणतीही अडचण येणार नाही- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद