शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 01:10 IST

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने ७ मेच्या मध्यरात्री आपल्या इमारतीला पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यास सुरुवात केली. अंधारात सुरू असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला व सुरू असलेले काम रोखले.

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची समस्या गंभीर आहे. गावातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता, ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहणाऱ्या इमारतींसाठी सध्या पाणी जोडणी देऊ नये, असे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच यांच्या एकमताने ठराव घेतला गेला होता. मात्र तरीही या ठरावाला फाटा देत आर्थिक हव्यासापोटी परस्पर ग्रामपंचायतीला हाताशी धरून काही नेतेमंडळी बांधकामासाठी पाणी देत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीतील काही सदस्य करत आहेत. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीतील पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे.ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने ७ मेच्या मध्यरात्री आपल्या इमारतीला पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यास सुरुवात केली. अंधारात सुरू असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला व सुरू असलेले काम रोखले. त्यावरून ग्रामस्थ व बिल्डर यांच्यात बाचाबाचीही झाली. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला रस्ताही कोणतीही परवानगी न घेता संबंधित बिल्डरने फोडला आहे. मुळात ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची भीषण टंचाई असताना बिल्डरला पाणी कसे पुरवले जाते, असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्या आरती सुनील सोनावळे व कल्पना डांगरे यांनी उपस्थित केला आहे. या वेळी ग्रामपंचातीच्या प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे बिल्डरने उघड केले. त्यामुळे ममदापूर ग्रामपंचायतीत वातावरण तापले आहे. या प्रकरणी ममदापूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारणा केली असता, आरोपांचे खंडन करून संबंधित बिल्डरविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाढते शहरीकरण लक्षात घेता, पाण्याचे स्रोत व पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. स्वत:ची हक्काची पाणी योजना पूर्ण होत नसल्याने गावासह वाडी आणि आता येथे उभ्या राहणाºया इमारतींचाही पाणीप्रश्न गंभीर बनत आहे.या प्रकरणात ममदापूर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मागे उभी राहते की बिल्डर लॉबीच्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बिल्डर लॉबीला पाणी न देता ग्रामस्थांच्या पाण्याच्या मागणीला प्राधान्य देण्याचा ठराव घेतला होता. तरीही बिल्डर लॉबीला पाणी दिले जाते. बिल्डर म्हणतो आम्ही तुमचे सदस्य व ग्रामसेवक यांना पैसे दिले आहेत. असे व्यवहार होत असतील तर दोषींवर कारवाईसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू.- आरती सोनावळे, ग्रामपंचायत सदस्यपाणी जोडणीच्या कामासाठी कोणतीही परवानगी किंवा ना हरकत दाखला दिलेला नाही. नेरळ ग्रामपंचायतीकडून त्यांनी पाणी जोडणी घेऊन परस्पर काम सुरू केले आहे. तेव्हा या कामाविरोधात ग्रामपंचायत आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करेल.- दामू हिरू निरगुडा, सरपंचममदापूर ग्रामपंचायत हद्दीत पाणी जोडणीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीची व ग्रामसेवक यांनी पैसे घेतले असा आरोप संबंधित बिल्डरने करून बदनामी केली आहे. याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू.- संजय राठोड, ग्रामसेवक

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी