शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

कोकणात जल अभियान

By admin | Updated: October 17, 2015 23:42 IST

सागरीकिनारपट्टी व सह्याद्री पर्वतरांगा अशा अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊ स कोकणात पडत असला, तरी जल व्यवस्थापनाच्या अभावी हे सर्वच पाणी नद्यांच्या

- जयंत धुळप,  अलिबागसागरीकिनारपट्टी व सह्याद्री पर्वतरांगा अशा अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊ स कोकणात पडत असला, तरी जल व्यवस्थापनाच्या अभावी हे सर्वच पाणी नद्यांच्या तीव्र उतारामुळे वाहून समुद्रात जाते. यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात मात्र कोरड्या पडतात. पावसाळ्यात पूरस्थिती व उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष अशी विचित्र परिस्थिती कोकणात निर्माण होते. या परिस्थितीवर लोकसहभागातून मात करण्याकरिता, रॅमन मॅगसेसे पुरस्कार व जलसंवर्धनाकरिताचे नोबेल पारितोषिक प्राप्त जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकणात जलबिरादरी महाराष्ट्र व कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून जल अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव यांनी दिली आहे.हे संपूर्ण अभियान जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात येणार आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्रसिंह यांना नुकतेच पाण्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील सता नद्या पुनर्जीवित केल्या आहेत. या नद्यांवर १३ हजार धरणे बांधून ४ जिल्हे सुजलाम सुफलाम केले आहेत आणि हे सर्व काम त्यांनी लोकसहभागातून करून दाखविले आहे.कोकणातील नद्यांमधील अनेक वर्षे गाळ उपसा नसल्याने नद्यांचे डोह भरून गेले आहेत. नदीला पाणी नसल्याने नदीकाठ व आसपासच्या परिसरात पावसाळ्याव्यतिरिक्त शेती होत नाही. शेती नसल्याने रोजगार नाही. यामुळे संपूर्ण क्रयशक्ती मुंबई पुण्यात स्थलांतरित झाली आहे. गावात फक्त वृद्ध माणसे व मुले राहतात. हे सर्व बदलण्यासाठी पाणी हा मुख्य मुद्दा आहे. नद्यांवर छोटी छोटी धरणे बांधणे, नद्यांचे डोह पुन्हा खोल करणे, दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यांवर आधुनिक शेती, शेतीतून उत्पादित मालांवर आधारित प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया उद्योगातून पर्यटनाचा विकास व पर्यटनातून संपूर्ण कोकणचा विकास अशा स्वरूपाचे हे जल अभियान हाती घेण्यात आले असल्याचे यादवराव यांनी सांगितले.या अभियानांतर्गत कोकण भूमी प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्रच्या जल अभियानाच्या माध्यमातून रत्नागीरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील जगबुडी नदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी या दोन नद्यांची निवड करण्यात आली आहे. लोकसहभागातून या दोन्ही नद्या बारमाही करणे. दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर आधुनिक शेती व यातून समृद्धी अशा स्वरूपाचे हे अभियान आहे. या नद्यांवर छोटी छोटी धरणे बांधणे, नद्यांचे डोह पुन्हा खोल करणे व नदी पुनर्स्थापित करणे अशा पद्धतीने पुढील पाच वर्षांत काम करण्यात येणार आहे.मुंबई-मालवण जलपरिक्रमा येत्या १ ते ५ डिसेंबर २०१५ या कालावधीत राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत मुंबई-मालवण अशी जलपरिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील अनेक नद्यांवर कार्यक्रम, पाणी व विषयात मोठ्या प्रमाणात जनजागृती, जगबुडी व अर्जुना या दोन नद्यांवर प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी पाचही दिवस डॉ. राजेंद्रसिंह यांची उपस्थिती लाभणार आहे.३ डिसेंबरला खेड येथे जल चेतना परिषदमुंबईपासून सुरू होणाऱ्या कोकण जल यात्रेत पनवेल, महाड, जगबुडी नदी क्षेत्र, चिपळूण, रत्नागिरी, अर्जुना नदी क्षेत्र, राजापूर, कणकवली, कुडाळ या ठिकाणी जल परिषदांचे व मेळाव्यांचे आयोजन करून इतर ठिकाणी लहान लहान शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. याचदरम्यान जगबुडी व अर्जुना नदीमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरला जगबुडी नदी खेड येथील जल चेतना परिषद व कार्यारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उपस्थित राहाणार आहेत. कोकणला जलसमृद्ध करणाऱ्या या जल अभियानात कोकणवासीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जलबिरादरी महाराष्ट्र व कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने यादवराव यांनी केले येत आहे.