शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंबा खोऱ्यातील पाणी जेएसडब्ल्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:05 IST

शेतकऱ्यांची मागणी डावलली : कंपनी-जलसंपदा विभागाचा करार रद्द करण्याची श्रमिक मुक्ती दलाची मागणी

आविष्कार देसाई 

अलिबाग : पाण्याचे नियोजन करताना आधी पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी आणि शेवटी उद्योगांसाठी वितरित करण्याचा नियम आहे. मात्र अंबा खोºयाचे पाणी स्थानिक शेतकºयांच्या तोंडातून काढून थेट जेएसडब्ल्यू कंपनीच्या घशात घालण्यासाठी आरक्षित केल्याची बाबमाहिती अधिकारातून उघड झाली आहे. शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, नियमांना हरताळ फासून जेएसडब्ल्यू कंपनीसोबत जलसंपदा विभागाने केलेला करार तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास अंबा खोºयाचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील अंबा खोºयाच्या पाण्यावर प्रथम स्थानिकांचा अधिकार आहे. यासाठी शहापूर-धेरंडसह परिसरातील अन्य गावांतील शेतकºयांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करून सरकारकडे अंबा खोºयाच्या पाण्यासाठी मागणी केली आहे. मात्र सरकारने स्थानिकांना अंधारात ठेवून जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी अंबा खोरे प्रकल्पातून तब्बल ४६.६६ दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन वितरित करण्याचा करार जलसंपदा विभागाने केला आहे.२०१६ ते २०२२ या कालावधीत कंपनीला पाणीपुरवठा करण्याचा करारामध्ये उल्लेख करण्यात आल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.कंपनीचा सरकारी जमिनीवर जसा डोळा आहे, तसाच अंबा खोºयाच्या पाण्यावरही डोळा आहे. त्यामुळेच विस्तारित प्रकल्पासाठी पर्यावरणीय सुनावणी झाली तेव्हा फक्त या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनाच सुनावणीला बोलावले होते.विस्तारित प्रकल्पात आमच्या जमिनी जाणार नसल्या तरी आमच्या हक्काचे पाणी कंपनी घेणार असल्याने आम्हालाही सुनावणीला बोलावणे गरजेचे होते, असे श्रमिक मुक्तीदलाचे नेते राजन भगत यांनी स्पष्ट केले.जेएसडब्ल्यू कंपनीने केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे जो प्रस्ताव सादर केला आहे, त्यामध्ये अंबा खोºयातील ४६.६६ दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन कंपनीला मिळणार आहे.यासाठी कंपनीने जलसंपदा विभागाबरोबर करार केला आहे. त्यामधील कागपत्रांच्या आधारे सदर बाब उघड झाली आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी सांगितले.रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी, जेएसडब्ल्यूला ८ फेब्रुवारी २०१६ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार ही बाब उघड झाली आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग कोकण प्रदेश नवी मुंबई यांच्या२००२ मधील पत्रानुसार ३४ दशलक्ष पाणी इस्पातला मिळत होते.करारनाम्यानुसार २२ पर्यंत आरक्षण१जेएसडब्ल्यू स्टील लि. यांना ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन तर अंबा रिव्हर कोक लि. यांना ७.०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याचे आरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली.२त्यानुसार रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कंपनीसोबत अंबा प्रकल्पांतर्गत नागोठणेतील बंधाºयातून ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतक्या बिगर सिंचन पाणी वापराबाबतचा करारनामा केला आहे.३करारनाम्यासोबत ३ कोटी २७ लाख ८९ हजार इतकी बँक हमी दिली आहे. या करारनाम्याचा कालावधी ४ फेब्रुवारी २०१६ ते ३ फेब्रुवारी २०२२ असा ६ वर्षांचा राहणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.करारनाम्यानुसार २२ पर्यंत आरक्षण१जेएसडब्ल्यू स्टील लि. यांना ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन तर अंबा रिव्हर कोक लि. यांना ७.०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याचे आरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली.२त्यानुसार रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कंपनीसोबत अंबा प्रकल्पांतर्गत नागोठणेतील बंधाºयातून ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतक्या बिगर सिंचन पाणी वापराबाबतचा करारनामा केला आहे.३करारनाम्यासोबत ३ कोटी २७ लाख ८९ हजार इतकी बँक हमी दिली आहे. या करारनाम्याचा कालावधी ४ फेब्रुवारी २०१६ ते ३ फेब्रुवारी २०२२ असा ६ वर्षांचा राहणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.पुनर्सर्वेक्षण रखडलेच्अंबा खोरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असता तर अलिबाग, पेण आणि रोहा तालुक्यातील ४३ गावांतील ६६९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती.च्त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील ४८२७ हेक्टरचा समावेश होता. परंतु जलसंपदा विभागाच्या उदासीनतेमुळे कालव्याचे काम झालेच नाही. ही बाब लक्षात घेऊन श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी २००७ मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते.च्अंबा खोºयाचे पाणी शेतीला मिळाले पाहिजे, यासाठी शेतकºयांनी गेली अनेक वर्षे संघर्ष केला आहे. २००७ मध्ये तब्बल २० दिवसांचे ठिय्या आंदोलन केले होते. २००८ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन कालव्याचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.च्२००९ मध्ये अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाला अहवाल सादर केला. परंतु पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग