शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:16 IST

सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत.

- विनोद भोईरपाली : सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत. अशातच पालीत कचरा व्यवस्थापन सातत्याने कुचकामी ठरत असून पालीत नेहमीच घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या कचराकुंड्या व त्यातून केरकचरा ओढणारे पाळीव प्राणी हे दृश्य पाहून कचरा व्यवस्थापन किती कुचकामी आहे, याची प्रचिती येते. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या घाण केरकचºयाने तुडुंब भरलेल्या आहेत, त्यातून दुर्गंधी बाहेर पडून नागरिकांना येता-जाता याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. अशातच पालीत दाखल होणाºया भाविक भक्तांनादेखील नाक धरुन जाण्याची नामुष्की ओढवते.उघड्यावरील घाणीमुळे अस्वच्छता व रोगराईची भीती वाढली आहे. पालीत स्वच्छता अभियानाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. गुरेढोरे अन्नाच्या शोधात कचराकुंड्यांना चारी बाजूने घेरतात. कचराकुंड्यात तोंड खुपसतात व कुंड्यातील प्लॅस्टिक व इतर पदार्थ गिळंकृत करतात. परिणामी अनेकदा गुरेदेखील दगावत असल्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात तर कचºयाची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.गटारे, नाले कचºयामुळे तुंबले असून, त्यातील घाण व सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे.पालीतील कचराकुंड्या ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून उपसल्या जातात. परंतु पालीच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व पालीतील कचºयाच्या ढिगासमोर मोजके सफाई कर्मचारी किती कष्ट उपसणार हेदेखील पाहणे गरजेचे आहे.अनेकदा पालीला स्वच्छ करण्यासाठी श्री सदस्यांचे हात अधिक मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पालीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पालीत स्वच्छता राखण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच तहसील कार्यालय व बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आदींनी पाली गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कचराकुं ड्यांची गरजसामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था व सक्षम नागरिकांनी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या भेट स्वरुपात देणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून एक पाऊल स्वच्छतेकडे टाकल्यास स्वच्छ पाली, सुंदर पालीचा नारा प्रत्यक्षात कृतीत उतरलेला पहावयास मिळेल. अन्यथा पालीला बकाल स्वरुप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.पाली शहराचा विस्तार झपाट्याने होत असून त्या प्रमाणात ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने जेवढा निधी येतो त्यामध्ये आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच कचरा कुंड्यांची व्यवस्था करणार आहोत.- गणेश बालके, सरपंच पाली ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड