शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस कॉरिडोरची प्रतीक्षा कायम; नियोजित जागेवर दुकानदारांचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:44 IST

खारघर शहरातील तीन सेक्टरमधून जाणारा सर्व्हिस कॉरिडोरचा रस्ता गायब झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती.

पनवेल - खारघर शहरातील तीन सेक्टरमधून जाणारा सर्व्हिस कॉरिडोरचा रस्ता गायब झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. ‘लोकमत’च्या बातमीनंतर सिडकोने सेक्टर १२ प्राइम मॉल या ठिकाणाहून ग्रामविकास भवन मार्गे इस्कॉन मंदिराकडे जाणारा नियोजित सर्व्हिस कॉरिडोर असल्याचे दुजोरा दिला होता; परंतु या घटनेला आठ महिने झाले तरी परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. या नियोजित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. बेकायदा पार्किंग सुरू आहे. त्यामुळे हा प्रस्तावित सर्व्हिस कॉरिडोर कधी तयार होणार, असा सवाल परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.सिडकोच्या आराखड्यात सुरु वातीपासूनच या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोर नियोजित करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात कोणीही आक्षेप घेतला नसल्याने दुकानदारांनी या ठिकाणी सिमेंटचे भराव टाकून ही जागा गिळंकृत केली. सध्याच्या घडीला याच जागेवर एका दुकानदाराने गाडी विक्र ीचा व्यवसाय थाटला आहे. सुमारे ५० ते ६० गाड्या या जागेवर ठेवून मागील पाच वर्षांपासून हा दुकानदार आपला व्यवसाय करत आहे. या जागेवर काँक्र ीटीकरण करून आपल्या पद्धतीने दुकानदार या जागेचा अनधिकृत वापर करीत आहे. ही बातमी प्रकाशित झाल्यांनतर सिडकोने या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोरच्या उभारणीच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, आठ महिने होऊनही याबाबत दुकानदारांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला दुकानदार बिनदिक्कत या जागेचा वापर करीत आहेत. संबंधित जागेवर सर्व्हिस कॉरिडोर असल्याची माहिती खारघरमधील रहिवासी शैलेश क्षीरसागर यांनी उघडकीस आणली होती.सर्व्हिस कॉरिडोरचा आराखडा त्यांना माहितीसाठी दिलेला आहे. मात्र संबंधित कामाला नेमकी कधी सुरुवात होईल असा प्रश्न त्यांना पडला आहे. या जागेवर अनधिकृतपणे काँक्र ीटीकरण करून त्याच्यावर आपला व्यवसाय थाटणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. खारघर वाहतूक शाखेचे अधिकारी प्रवीण पांडे यांनीदेखील या ठिकाणी लवकरात लवकर सर्व्हिस कॉरिडोर उभारण्याची मागणी सिडकोकडे केली होती.लवकरच होणार कार्यवाहीसिडकोचे खारघरमधील अधिकारी ए. टी. अनुसे यांनी यासंदर्भात सर्व्हिस कॉरिडोर उभारणीचा आराखडा तयार केला असल्याचे सांगितले. यानंतर टेंडर काढून या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोरचे काम हाती घेतले जाईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी